मुंबई : अमेरिका आणि आशियातील  बाजारातील घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर सेन्सेक्समध्ये 400 हून अधिकांची घसरण झाली. सेन्सेक्स बातमी लिहीपर्यंत 73695 अकांपर्यंत ट्रेड करत आहे. निफ्टीमध्ये 100 अंकांची घसरण सुरु आहे. आज सुरुवातीच्या सत्रात इंडसइंड बँकेचा शेअर 20टक्क्यांनी घसरला असून 720.35 रुपयांवर पोहोचला आहे.  

Continues below advertisement

अमेरिकेत मंदीची शक्यता असल्यानं जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण सुरु आहे. अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजारात घसरण सुरु झाली आहे. वॉल स्ट्रीटवर देखील घसरण पाहायला मिळाली.  आशियाई बाजारात जपानचा निर्देशांक निक्केई 225 मध्ये 2.7 टक्क्यांनी घसरला. टॉपिक्स इंडेक्स  2.8  टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 2.19 अंकांनी घसरला. कोस्डॅक 2.22 अकांनी घसरला. 

अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता असल्यानं वॉल स्ट्रीटवर हाहाकार उडाला. अमेरिकेचा शेअर बाजार देखील घसरण झाली. एस अँड पी 500 मध्ये निर्देशांकात मोठी घसरण झाली. डाऊन जोन्स इंडस्ट्रीयल एवरेज 890.1 अंकांनी म्हणजेच 2.08 टक्क्यांनी घसरुन 41911.71 वर आला. एस अँड पी 500 निर्देशांक 155.64 अकांनी घसरला. नॅस्डॅक कम्पोझिट 727.90 अकांनी घसरला. 

Continues below advertisement

टेस्लाचा शेअर 15.4 टक्क्यांनी घसरला आहे. एनविडीयाच्या शेअरमध्ये 5.07 टक्क्यांची घसरण झाली. मायक्रोसॉफ्टचा शेअर 3.34 टक्क्यांनी घसरले. नॅस्डॅकचा 100 निर्देशांक  3.81  टक्क्यांनी घसरला आहे. 

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि जागतिक संकेत कमजोर असल्यानं ही घसर णझाली. आशियाई आणि अमेरिकन बाजारातील घसरण यामुळं भारतीय शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले आहेत.  

शेअर बाजारातील घसरणीमुळं सेन्सेक्सवरील 30 शेअरपैकी 21 शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. केवळ 9 शेअरमध्ये तेजी होती. दुसरीकडे निफ्टी 50 मध्ये 33 शेअरमध्ये घसरण तर 17 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तेजी असणाऱ्या शेअरमध्ये आयसीआयसीआय बँक,  सन फार्मा , एनटीपीसी   मारुति सुझुकी,नेस्ले इंडिया , टाटा मोटर्स , भारती एअरटेल , टाटा मोटर्स या शेअरमध्ये तेजी आहे. इंडसइंड बँकेचा शेअर 20 टक्क्यांनी घसरला. यासह इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि झोमॅटो, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा मध्ये देखील घसरण झाली. 

इतर बातम्या :

Demat Account : शेअर बाजारात नवगुंतवणूकदारांच्या एंट्रीचा वेग मंदावला, डीमॅट खात्याबाबत फेब्रुवारीतील धक्कादायक आकडे समोर, दोन वर्षांची...

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)