Demat Account : शेअर बाजारात नवगुंतवणूकदारांच्या एंट्रीचा वेग मंदावला, डीमॅट खात्याबाबत फेब्रुवारीतील धक्कादायक आकडे समोर, दोन वर्षांची...

Demat Account : भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून घसरण सुरु आहे. याचा परिणाम नवगुंतवणूकदारांवर देखील होत आहे.

Continues below advertisement

डीमॅट खाते

Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून जोरदार घसरण सुरु आहे. याचा परिणाम नवगुंतवणूकदारांवर झाला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास डीमॅट खातं उघडावं लागतं. फेब्रुवारी महिन्यात डीमॅट खातं उघडणाऱ्यांची संख्या घटली आहे.
2/6
फेब्रुवारी 2025 मध्ये 22 लाख 60 हजार डीमॅट खाती उघडण्यात आली. मे 2023 पासूनची ही सर्वात कमी संख्या आहे.
3/6
डीमॅट खाती उघडण्याचा वेग जुलै 2024 पासून कमी झाला आहे. जुलै 2024 मध्ये 45 लाख 50 हजार डीमॅट खाती उघडण्यात आली होती. जानेवारी 2025 मध्ये 28 लाख डीमॅट खाती उघडण्यात आली.
4/6
शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला होता. निफ्टीमध्ये गेल्या तीन शतकांमधील मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्च 2020पासून निफ्टी 50 6 टक्क्यांनी घसरला. तर, निफ्टी मिडकॅप 100 हा निर्देशांक 11 टक्के तर निफ्टी स्मॉलकॅप 100 हा निर्देशांक 13 टक्क्यांनी घसरला आहे.
5/6
दरम्यान, भारतातील डीमॅट खातेधारकांची संख्या 19 कोटी इतकी आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola