Share Market Closing Bell : आठवड्यातील व्यवहाराच्या सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने नीचांकी स्तरापासून सावरत वधारत बंद झाला. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा (Stock Market) निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 162 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. सेन्सेक्समध्ये (Sensex) विक्रीचा जोर दिसल्याने निर्देशांक 368 अंकांपर्यंत घसरला होता. बाजारात अखेरच्या एका तासात गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 137 अंकांच्या तेजीसह 65,539 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 30 अंकांनी वधारत 19,465 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी?

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर बँकिंग आणि मेटल्समधील शेअर दरात घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकामधील 30 कंपन्यांपैकी 17 शेअर्स तेजीसह बंद झाले. तर निफ्टीतील 50 पैकी 25 शेअर्स तेजीसह स्थिरावले. 

इंडेक्‍सकिती अंकांवर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex65,539.4265,605.7465,032.890.00
BSE SmallCap35,297.1435,329.5435,030.160.52%
India VIX12.1312.6812.001.08%
NIFTY Midcap 10037,801.6537,844.4537,526.350.08%
NIFTY Smallcap 10011,728.5011,739.8511,618.250.57%
NIfty smallcap 505,329.605,350.105,311.50-0.10%
Nifty 10019,358.0519,375.0519,212.750.14%
Nifty 20010,302.8010,312.0010,228.300.13%
Nifty 5019,465.0019,482.7519,317.200.16%

गुंतवणूकदारांचा फायदा 

आजच्या व्यवहारात बाजाराच्या नीचांकी स्तरावरून सावरल्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांचे बाजार भांडवल ( Market Capital ) 304.36 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. मागील ट्रेडिंग सत्रात 303.67 लाख कोटी इतके बाजार भांडवल होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात बाजार भांडवलात 69,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

1850 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ

 मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आजच्या व्यवहारात बहुसंख्य शेअर्स तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,757 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,850 शेअर्स वधारत बंद झाले. त्याच वेळी 1779 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 128 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 212 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 44 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकाला गाठला.  आज 282 कंपन्यांच्या शेअर्सला अप्पर सर्किट (Upper Circuit ) लागले. तर, 266 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट ( Lower Circuit ) लागले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: