Vivek Agnihotri : बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या सिनेमांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा ते चर्चेत असतात. आता त्यांचं एक ट्वीट व्हायरल होत आहे. "मला प्रोपगंडा करायला आवडतं त्यामुळे पुण्य मिळतं"; असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत अखेर जाहीर केलं आहे.


विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं जात होतं. तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी या सिनेमाचे खास शो आयोजित केले होते. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. हा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हटलं गेलं. 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या सिनेमामुळेही विवेक अग्निहोत्री चर्चेत आहे. या सिनेमामुळेही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने विवेक अग्निहोत्रींना प्रपोगंडा सिनेमा बनवायला आवडतं, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत अग्निहोत्रींनी आवडत असल्याचं जाहीर केलं आहे.


विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट काय आहे? (Vivek Agnihotri Tweet)


विवेक अग्निहोत्री आपल्या सिनेमांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखले जातात. मनोरंजनसृष्टीसह अनेक सामाजिक विषयांवर ते व्यक्त होत असतात. आता त्यांच्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका ट्विटर यूजरने ट्वीट करत अग्निहोत्रींना विचारलं आहे,"तुम्ही प्रपोगंडा सिनेमे का बनवतो?". या ट्वीटला उत्तर देत अग्निहोत्रींनी लिहिलं आहे,"भारताचा प्रचार करायला मला आवडतं. आता मला याचं व्यसन लागलं आहे. तुम्हीदेखील प्रयत्न करा. खूप शांती आणि पुण्य मिळतं". विवेक अग्निहोत्री यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






विवेक अग्निहोत्रींचा 'द वॅक्सीन वॉर' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! (Vivek Agnihotri The Vaccine War Released Date)


विवेक अग्निहोत्री सध्या 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 15 ऑगस्टला या सिनेमाची पहिली झलक शेअर करत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमात पल्लवी जोशी, नाना पाटेकर, अनुपर खेर, राइमा सेनसह अनेक कलाकार झळकणार आहेत. कोरोनाकाळावर आधारित हा सिनेमा असणार आहे. विवेक अग्निहोत्री 'द कश्मीर फाइल्स', 'द ताशकंद फाइल्स', 'बुद्धा इन अ ट्रैफिक' सारख्या सिनेमांसाठी ओळखले जातात. 


संबंधित बातम्या


The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'ची रिलीज डेट जाहीर! सत्य घटनेवर आधारित असणार सिनेमा