Amrit Udyan Reopen : राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) प्रसिद्ध अमृत उद्यान (Amrit Udyan), जे या आधी मुघल गार्डन या नावाने प्रसिद्ध होतं ते पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आजपासून सुरु झालेलं हे उद्यान महिनाभर पर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. 14 ऑगस्ट रोजी अमृत उद्यान सुरू करण्याबाबत राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले. राष्ट्रपती भवनाचं हे उद्यान वर्षभरात दुसऱ्यांदा खुलं होत असल्याचं प्रथमच घडतंय. वर्षाच्या सुरुवातीला हे उद्यान प्रथमच उघडण्यात आले होते. तेव्हा 10 लाखांहून अधिक लोक येथे भेट देण्यासाठी आले होते. तरी, ज्या नागरिकांना, पर्यटकांना उद्यानाला भेट द्यायची आहे ते अधिकृत वेबसाईटवरही बुकिंग करू शकतात. याशिवाय प्रवेश पासही उपलब्ध आहेत.
मुघल गार्डनेचे नाव बदलून अमृत उद्यान
राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव या वर्षीच्या सुरुवातीला बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असं ठेवण्यात आलं आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते. राष्ट्रपती भवनाचे हे गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात या गार्डनमध्ये 138 प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे. या गार्डनमध्ये 10 हजारांहून अधिक ट्युलिप फुलेही आहेत. याशिवाय हंगामी फुलांच्याही 5 हजार प्रजाती आहेत.
'या' वेबसाईटवरून बुकिंग करा
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग करता येईल. याशिवाय गेट क्रमांक-35 जवळील सध्याच्या किऑस्कमधूनही प्रवेश पास घेता येतील. उद्यानात प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अमृत उद्यानासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
5 सप्टेंबरला शिक्षकांसाठी उद्यान खास खुलं असणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी अमृत उद्यानाला भेट दिली. उद्यान उत्सव-2 अंतर्गत अमृत उद्यान 16 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत नागरिकांसाठी खुले राहणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. केवळ सोमवारीच नागरिकांना उद्यानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी हे उद्यान केवळ शिक्षकांसाठी खुलं राहणार आहे.
'या' वेळेत उद्यानात फिरू शकतील पर्यटक
पर्यटकांना उद्यानात फिरण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पर्यटकांना उद्यानात फिरता येईल, असेही सांगण्यात आले. शेवटचा प्रवेश फक्त दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. उद्यान उत्सव-1 अंतर्गत 29 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान अमृत उद्यान खुले करण्यात आले होते. त्यावेळी 10 लाखांहून अधिक पर्यटक येथे आले होते.
भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक सीमा रेषेवर मिठाईची देवाणघेवाण
भारतीय सैनिकांनी मंगळवारी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ, जम्मू आणि सांबा जिल्ह्यात त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांबरोबर मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली. पूंछमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांनी चक्कन दा बाग आणि नियंत्रण रेषेजवळील इतर भागात मिठाईची देवाणघेवाण केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :