Share Market Closing Bell Today: अनेक मोठ्या कंपन्यांचे निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे न लागल्याने सोमवारी, 24 जुलै रोजी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 305 अंकांनी घसरून बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 19,650 अंकांच्या पातळीजवळ बंद झाला. एफएमसीजी, एनर्जी, बँकिंग, ऑईल अॅण्ड गॅसच्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. दुसरीकडे, युटिलिटीज आणि कॅपिटल गुड्जच्या शेअर दरात तेजी दिसून आली. आजच्या व्यवहारात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 21 हजार कोटी रुपये बुडाले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 299.48 अंक अर्थात 0.45 टक्क्यांनी घसरून 66,384.78 वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) 78.55 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी घसरून 19,666.45 च्या पातळीवर आला.
आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक 2.01 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.56 टक्के, पॉवरग्रीड 1.3 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.30 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.14 टक्के, एशियन पेंट्स 0.74 टक्के, लार्सन 0.74 टक्के, टीसीएस 0.73 टक्के, टाटा मोटर्स 0.55 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. आयटीसी 3.87 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा 3.80 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 2.80 टक्क्यांनी, रिलायन्स 1.92 टक्क्यांनी, टाटा स्टील 1.03 टक्क्यांनी घसरले.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE MidCap | 29,634.85 | 29,763.03 | 29,557.59 | 00:04:19 |
BSE Sensex | 66,384.78 | 66,808.56 | 66,326.25 | -0.45% |
BSE SmallCap | 34,172.03 | 34,355.47 | 34,143.06 | 0.07% |
India VIX | 11.65 | 12.00 | 10.54 | 1.46% |
NIFTY Midcap 100 | 36,742.60 | 36,940.85 | 36,705.70 | -0.15% |
NIFTY Smallcap 100 | 11,571.90 | 11,625.25 | 11,548.20 | 0.37% |
NIfty smallcap 50 | 5,196.05 | 5,225.15 | 5,172.55 | 0.23% |
Nifty 100 | 19,540.45 | 19,642.80 | 19,526.65 | -0.32% |
Nifty 200 | 10,344.10 | 10,396.85 | 10,336.75 | -0.29% |
Nifty 50 | 19,672.35 | 19,782.75 | 19,658.30 | -0.37% |
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये आज वाढीपेक्षा तोट्याने बंद झालेल्या समभागांची संख्या जास्त आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,855 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,775 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,921 समभागांमध्ये घसरण झाली. तर 159 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारात 268 समभागांनी अपर सर्किट मारले. त्याच वेळी, 274 शेअर्स त्यांच्या लोअर सर्किट मर्यादेला स्पर्श करून बंद झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर; नफ्यात 11 टक्क्यांची घट
देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) एप्रिल ते जून या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे (Quarter 1 result) निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 11 टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत रिलायन्सचा नफा (Reliance Profit) 16,011 कोटी रुपये आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा 17,955 कोटी रुपये होता.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑपरेशनमधून मिळणारे उत्पन्न देखील 5.3 टक्क्यांनी घसरले आहे. यंदाच्या वर्षातील तिमाहीत 2.11 लाख कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 2,23,113 कोटी रुपये इतके उत्पन्न होते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश (Reliance Dividend) जाहीर केला आहे.