Share Market Closing Bell: सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार तेजीसह बंद झाला. दिवाळीच्या एक आठवड्याआधी बाजार खरेदीचा जोर दिसला. बँकिंग (Banking) आणि एनर्जी (Energy) कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. या सेक्टरमधील खरेदीमुळे बाजार तेजीत बंद झाला. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 492 अंकांच्या तेजीसह 58,410 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 134 अंकांच्या तेजीसह 17,320  अंकांवर बंद झाला.


शेअर बाजारातील व्यवहार सकाळी सुरू झाले तेव्हा बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला होता. सुरुवातीच्या एक-दोन तासानंतर बाजार सावरू लागला. आज दिवस व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, मेटल्स, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर दरात खरेदी दिसून आली.  


निफ्टी 50 मधील 34 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदी दिसून आली. तर, 16 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सात कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसली. 


आज बाजारात एसबीआय 3.20 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2.05 टक्के, अॅक्सिस बँक 1.97 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.84 टक्के, एनटीपीसी 1.64 टक्के, इंडसइंड बँक 1.58 टक्के, रिलायन्स इंडस्ट्री 1.44 टक्के, कोटक महिंद्रा 1.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. 


शेअर बाजारात नफावसुलीही दिसून आली. यामध्ये हिंदाल्को 2.23 टक्के, लार्सन 1.49 टक्के, जेएसडब्लू स्टील 1.37 टक्के, एचसीएल टेक 0.79 टक्के,  विप्रो 0.58 टक्के, टाटा स्टील 0.55 टक्के, ब्रिटानिया 0.49 टक्के, बीपीसीएल 0.44 टक्के, पॉवरग्रीड 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. 


सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीतील 50 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 39 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली होती. 


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 288 अंकांच्या घसरणीसह 57631 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक  91.25 अंकांच्या घसरणीसह 17094  अंकांवर व्यवहार करत होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: