Share Marker Updates : शेअर बाजारात आज दिवसभर विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ट्रेंड दिसून आला.
आज, सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26 अंकानी घसरला. जवळपास 1.08 टक्क्यांची घसरण होऊन सेन्सेक्स 56,579.89 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, निफ्टी इंडेक्स 218 अंक म्हणजे 1.27 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 16,953.95 अंकावर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समधील 30 पैकी 8 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. त्याशिवाय, इतर सर्व स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली.
HDFC Bank चा शेअर 0.75 टक्क्यांनी वधारला. एचडीएफसी बँकेचा शेअर 1365.55 रुपयांवर बंद झाला. त्याशिवाय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, मारूती, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडियांच्या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली.
त्याशिवाय, आज टाटा स्टीलमध्ये आज मोठी घसरण झाली. टाटा स्टीलच्या शेअरच्या दरात 4.47 टक्क्यांची घसरण झाली. टाटा स्टीलचा शेअर 1220 रुपयांवर बंद झाला. त्याशिवाय, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, टायटन, आयटीसी, एलटी, सन फार्मा, अल्ट्रा केमिकल, टीसीएस, विप्रो, एसबीआय, पॉवरग्रीड आदी शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
आज शेअर बाजारात निफ्टी ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, निफ्टी रिअल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टर आदी क्षेत्रातील स्टॉकच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. या क्षेत्रात मोठी विक्री झाली. भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरू आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. ऑक्टोबर 2021 ते आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: