Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात विक्रीचा (Share Market) सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे. अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्स बाबत हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबण्याचे चित्र दिसत नाही. नफावसुलीचा जोर दिसत असल्याने आठवड्यातील चौथ्या सत्रातही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 139 अंकाच्या घसरणीसह 59,606 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 43 अंकांच्या घसरणीसह 17,511 अंकांवर स्थिरावला.
आयटी आणि मेटल स्टॉकमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे काही प्रमाणात घसरणीला लगाम लागला. बँक आणि वित्तीय सेवांशी संबंधित शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 17 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसून आले. तर, 26 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1570 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर, 1776 कंपन्यांचे शेअर्स घसरले. 152 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
आज दिवसभरातील व्यवहारात एचसीएलटेक, टीसीएस, टेकएम, टाटास्टील, विप्रो, एल अॅण्ड टी या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, मारुती, एचडीएफसी, रिलायन्स, एअरटेल यांच्या शेअर दरात घसरण झाली.
BSE Sensex | 59,615.82 | 59,960.04 | 59,406.31 | -0.22% |
BSE SmallCap | 27,632.31 | 27,716.17 | 27,417.92 | 0.08% |
India VIX | 15.08 | 16.01 | 14.52 | -3.29% |
NIFTY Midcap 100 | 30,165.65 | 30,257.60 | 29,883.50 | -0.15% |
NIFTY Smallcap 100 | 9,237.65 | 9,276.80 | 9,158.35 | -0.08% |
NIfty smallcap 50 | 4,186.45 | 4,194.30 | 4,137.90 | 0.40% |
Nifty 100 | 17,286.30 | 17,386.30 | 17,224.20 | -0.28% |
Nifty 200 | 9,058.70 | 9,106.00 | 9,019.40 | -0.26% |
Nifty 50 | 17,511.25 | 17,620.05 | 17,455.40 |
-0.25% |
या शेअर्समध्ये चढ-उतार
आज, शेअर बाजारातील व्यवहारात टाटा स्टीलमध्ये 0.67 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, सन फार्मा 0.52 टक्के, मारुती सुझुकी 0.42 टक्के, टीसीएस 0.40 टक्के, एचसीएल टेक 0.38 टक्के, कोटक महिंद्रा 0.38 टक्के, टेक महिंद्रा 0.24 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 0.21 टक्क्यांची तेजी दिसून आली.
एशियन पेंट्समध्ये 3.20 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. त्याशिवाय, टायटन 1.34 टक्के, इंडसइंड बँक 1.30 टक्के, बजाज फिनसर्व 1.01 टक्के, भारती एअरटेल 0.98 टक्क्यांची घसरण दिसून आली.
गुंतवणूकदारांना फटका
आज दिवसभरात बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 260.88 लाख कोटी इतके झाले. बुधवारी, 261.345 लाख कोटी इतके बाजार भांडवल होते. आज दिवसभरात गुंतवणूकदारांना 46 हजार कोटींचे नुकसान झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: