Share Market Closing Bell : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसला. खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात (Share Market) आज तेजी दिसून आली. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 59, 000 अंकांचा टप्पा ओलांडला. आज बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 442 अंकांच्या तेजीसह  59,245 अंकांवर, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक (NSE) निफ्टीमध्ये (NIFTY) 126 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 17,665 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीतही सर्व 12 स्टॉक्समध्ये तेजी दिसली. 


शेअर बाजारातील सगळ्याच सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस शिवाय मीडिया सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसला आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही तेजी दिसून आली.  निफ्टीतील 50 पैकी 35 स्टॉक्सच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 15 कंपन्यांचे शेअर्सचे घसरले. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 24 शेअर्सचे दर वधारले. तर, 6 शेअर्सच्या दरात घसरण झाली. 


वधारणारे शेअर्स


आज बाजारात सन फार्मा 1.81 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 1.78 टक्के, एनटीपीसीमध्ये 1.70 टक्के, रिलायन्सच्या शेअर दरात 1.60 टक्के, एचसीएल टेक 1.28 टक्के, टाटा स्टील 1.28 टक्के, लार्सन 1.18 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.15 टक्के, भारती एअरटेल 0.85 टक्के, कोटक महिंद्र बँक 0.83 टक्क्यांनी वधारले. 


घसरणारे शेअर्स


आज बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.84 टक्क्यांनी घसरण झाली. नेस्लेमध्ये 1.54 टक्के, ब्रिटानिया 1.12 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 0.84 टक्के, अपोलो हॉस्पिटलमध्ये 0.69 टक्के, आयशर मोटर्समध्ये 0.63 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर्स दरात 0.60 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 0.54 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 0.36 टक्के, एचडीएफसी लाइफच्या शेअर दरात 0.21 टक्क्यांची घसरण झाली. 


एसजीएक्स निफ्टीमध्ये घसरण दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही घसरण होईल असे संकेत होते. मात्र, एसजीएक्स निफ्टीतील घसरणीनंतरही  भारतीय शेअर बाजार वधारला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: