Share Market Closing Bell:  भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून (Share Market Fallen) आली. जागतिक पातळीवर शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आज शेअर बाजारात नफावसुली झाल्याने निर्देशांकात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 419 अंकांच्या घसरणीसह 61 हजार अंकांच्या खाली घसरून 60,613 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी (Nifty) निर्देशांक 120 अंकांच्या घसरणीसह 18,036 अंकांवर बंद झाला. 


आज बाजारात झालेल्या घसरणीत सर्व सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टी 50 तील 12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 38 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 7 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर उर्वरित 27 कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसला. 


बाजारातील एकूण 3592 कंपन्यांमध्ये व्यवहार झाले. त्यातील 1271 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2191 कंपन्यांचे शेअर दरात घसरण दिसून आली. 126 कंपन्यांच्या शेअर दरात बदल झाला नाही. 235 कंपन्यांच्या शेअर दरात अप्पर सर्किट लागले. तर, 173 कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले. 


आज बाजारात हिरो मोटोकॉर्पच्या शेअर दरात 2.30 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, एचडीएफसी बँक 1.09 टक्के, कोटक महिंद्रा 0.99 टक्के, ओएनजीसी 0.87 टक्के, भारती एअरटेल 0.82 टक्के, यूपीएलच्या शेअर दरात 0.33 टक्क्यांची तेजी दिसून आली. डॉ. रेड्डी लॅब 0.32 टक्के, अदानी पोर्टस 0.30 टक्के, एचयूएल 0.19 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. 


आज आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या घसरणीसह 60,709  अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांच्या घसरणीसह 18,066 अंकांवर खुला झाला. आज सकाळपासून बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: