Meta Layoffs : मेटा ( Meta ) कंपनीने फेसबुक ( Facebook ), इंस्टाग्राम ( Instgram ) , व्हॉट्सॲपमधील ( Whats App ) 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून ( Layoffs ) काढलं आहे. मार्क झुकरबर्ग ( Mark Zuckerberg ) यांनी 13 टक्के नोकर कपात केली आहे. मेटा कंपनीचे सीईओ  मार्क झुकरबर्ग यांनी ही मोठी माहिती दिली आहे. 


कंपीन तोट्यात असल्याचं सांगितलं कारण


फेसबुकची मूळ मालकी असलेल्या मेटा कंपनीने सुमारे 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक( Facebook ), इंस्टाग्राम ( Instgram ), व्हॉट्सॲप ( Whats App ) या आघाडीच्या सोशल मीडिया ॲपची मालकी असलेली मेटा कंपनी सध्या तोट्यात असल्याचं कंपनीने सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.


मार्क झुकरबर्ग यांनी नोकर कपातीबाबत खालील पाच गोष्टी सांगितल्या आहेत.


1. मेटा कंपनीच्या फॅमिली ऑफ ॲप्स आणि रिॲलिटी लॅब या दोन्हीमध्ये संस्थेमधून नोकर कपात केली जात असल्याचं मार्क झुकरबर्गने ( Mark Zuckerberg ) सांगितलं आहे. फेसबुक( Facebook ), इंस्टाग्राम ( Instgram ), व्हॉट्सॲप ( Whats App ) आणि इतर सेवांवर काम करणाऱ्या लोकांनाही याचा फटका बसला आहे. ट्विटर कंपनी खर्च वाचवण्यासाठी आपले निम्मे कर्मचारी कामावरून काढून टाकल्यानंतरच काही दिवसांनी मेटा कंपनीनेही हा मोठा निर्णय घेतला आहे. 


2. मेटा कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयाची जबाबदारी मार्क झुकरबर्गने घेतली आहे. मार्कने पुढे सांगितलं की कंपनी खर्चात कपात करणार आहे. या कर्मचारी कपातीला झुकरबर्गने आर्थिक परिस्थितीचं कारण दिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार वाढलेली स्पर्धा आणि जाहिरातांमधील तोटा यामुळे फेसबुकचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे.


3. मेटा कंपनीकडून 2023 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत नवीन नियुक्ती करण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर भरती पुन्हा सुरू करावी की नाही हे कंपनीची आर्थिक परिस्थिती, कार्यप्रदर्शन,  कार्यक्षमता आणि इतर आर्थिक बाबींवर अवलंबून असेल.


4. कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच या संदर्भात ईमेल पाठवण्यात येईल. कंपनी काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 16 आठवड्यांचं मूळ वेतन आणि प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी अतिरिक्त आठवड्याचं वेतन देण्याचे वचन दिलं आहे. याशिवाय कंपनी पुढील सहा महिन्यांसाठी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य सेवेचा खर्चही देईल. 


5. येत्या काळात कंपनीच्या कामाच्या पद्धतीतही बदल करण्यात येणार आहे. जे लोक आधीच ऑफिसबाहेर जास्त वेळ घालवतात काम करतात, त्यांच्या डेस्कवर काम करण्याची परवानगी मिळेल. येत्या काही महिन्यांत हे बदल स्पष्ट केले जातील.