Share Market Closing Bell : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून (Share Market Fallen) आला. सकाळी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरलाही होता. मात्र, विक्रीच्या सपाट्याने शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 770.48 अंकांच्या घसरणीसह (Sensex Falls) 58,766.59 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 216.50 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,542.80 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा 1904 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1446 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी बाजार उघडताच 700 हून अधिक अंकांची घसरण झाली होती.
बाजारातील सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. ऑटो आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण तेजी दिसून आली. ग्राहकोपयोगी वस्तू, आयटी, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरशिवाय मीडियातही घसरण दिसून आली. तर, मिडकॅप आणि स्मॉल कॅपचे शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 12 स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. तर, 38 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर दरात तेजी दिसून आली. बँक निफ्टीतील 12 पैकी 7 शेअरमध्ये विक्री दिसून आली.
आज या शेअरमध्ये घसरण
रिलायन्सच्या शेअर दरात 2.79 टक्क्यांची घसरण दिसून आली. टीसीएसच्या शेअर दरात 2.32 टक्के, सन फार्माच्या शेअर दरात 2.21 टक्के, टेक महिंद्रा 1.92 टक्के, इन्फोसिसमध्ये 1.75 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.74 टक्के, एचयूएलच्या शेअरच्या 1.73 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 1.64 टक्क्यांची घसरण दिसून आली.
हे शेअर दर वधारले
बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात 2.58 टक्के, भारती एअरटेल शेअर दरात 1.03 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 0.93 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 0.56 टक्के, एशियन पेंट्सच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची वाढ झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: