GST Collection August: जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील जीएसटी कर संकलनात घट झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,43,612 कोटी रुपये इतकं करण्यात आले. जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1,48,995 कोटी रुपये इतके होते. सध्याच्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन अधिक होते. एप्रिल महिन्यात 1,67,540 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला. हा जीएसटी मागील वर्ष ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 28 टक्क्यांनी अधिक आहे. मागील सहा महिन्यांपासून जीएसटी कर संकलन एक लाख 40 कोटी रुपयांच्या आसपास राहिला आहे. ऑगस्ट 2022 पासून जीएसटी करात सीजीएसटी 24 हजार 710 कोटी रुपये, एसजीएसटी 32 हजार 951 कोटी रुपये  इतके होते. तर, 77 हजार 782 कोटी रुपयांचा आयजीएसटी वसूल करण्यात आला. त्यातील 42 हजार 0678 कोटी रुपये हे आयातीद्वारे वसूल करण्यात आले. उपकराचा (सेस) वाटा 10 हजार 168 कोटी रुपये इतका आहे. एक जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी संकलनात हा दुसरा मोठा सर्वाधिक आकडा आहे. 






अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी ऑगस्ट 2021 च्या तुलनेत जीएसटी महसूल हा 33 टक्क्यांनी अधिक आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदाव येत असून जीएसटी कर संकलनावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जीएसटी चोरी रोखण्यासाठी उचलण्यात आलेले पावले, बनावट बिलं तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असल्याने त्याच्या परिणामी जीएसटी कर संकलनात वाढ झाली आहे. 


महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी 


महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्याशी तुलना करता यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 24 टक्क्यांनी जीएसटीत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्रातून 18 हजार 863 कोटींचा जीएसटी वसूल झाला. कर्नाटकमधून 9583 कोटी, गुजरातमधून 8684 कोटी रुपये, तामिळनाडूमधून 8386 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला. 


इतर महत्त्वाची बातमी: