Share Market Updates :  भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवसही निराशाजनक राहिला. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर आजही खरेदीचा जोर दिसल्याने निर्देशांक वधारला होता. त्यानंतर नफावसुली सुरू झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. आज, दिवसभरातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 58 हजार अंकांखाली आला. सेन्सेक्स 337 अंकांच्या घसरणीसह 57,900  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 111 अंकांच्या घसरणीसह 17,043 अंकांवर स्थिरावला. 


शेअर बाजारात आज फार्मा, मीडिया आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर दर घसरून बंद झाले. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आदी क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील शेअर्स दरात आजही घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 7 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, निफ्टी 50 मधील 12 कंपन्यांचे शेअर दर वधारले आणि 38 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 57,900.19 58,490.98 57,721.16 -0.58%
BSE SmallCap 27,162.16 27,427.91 27,045.50 -0.77%
India VIX 16.22 16.64 15.0025 0.0002
NIFTY Midcap 100 29,949.35 30,165.50 29,808.80 -0.52%
NIFTY Smallcap 100 9,043.15 9,141.95 9,007.00 -0.83%
NIfty smallcap 50 4,078.60 4,122.60 4,059.20 -0.79%
Nifty 100 16,887.05 17,060.05 16,826.10 -0.65%
Nifty 200 8,868.30 8,955.35 8,835.60 -0.63%
Nifty 50 17,043.30 17,224.65 16,987.10 -0.65%
Nifty 50 USD 7,237.48 7,237.48 7,237.48 0.00%
Nifty 50 Value 20 9,127.65 9,254.75 9,095.55 -0.99%
Nifty 500 14,358.55 14,499.20 14,306.80 -0.66%
Nifty Midcap 150 11,304.70 11,395.90 11,259.95 -0.62%
Nifty Midcap 50 8,423.50 8,472.00 8,372.75 -0.38%
Nifty Next 50 37,375.55 37,669.20 37,150.40 -0.58%

 

आज तेजीत असलेले शेअर्स

आज दिवसभरातील व्यवहारात बीपीसीएलच्या शेअर दरात 1.12 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, टायटनमध्ये 1.01 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.85 टक्के, लार्सनमध्ये 0.49 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये 0.43 टक्के, इंडसइंड बँक 0.37 टक्के, सनफार्मामध्ये 0.32 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे, 

या शेअर्समध्ये घसरण 

आज झालेल्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 7.27 टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी पोर्ट्समध्ये 3.92 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2.74 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 2.047 टक्के, एचडीएफसी लाइफच्या शेअर दरात 1.75 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 1.75 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

गुंतवणूकदारांना फटका

आज झालेल्या घसरणीचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 256.53 इतके झाले. सोमवारी बाजार भांडवल 258.56  लाख कोटी इतके होते.