Navin Prabhakar : महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात या भूमीला आपल्या ज्ञानाने पावन बनवणाऱ्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांची नावे प्रमुख आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचे समकालीन समर्थ रामदास ज्यांना छत्रपतींनी स्वतःचे मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून निवडले होते. त्यांचे खरे नाव नारायण होते, परंतु त्यांनी स्वतःला रामदास म्हणजे रामाचा सेवक म्हणवून घेणे पसंत केले. दख्खनमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात धार्मिक छळ व्हायच्या त्या काळात लोकांच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी भगवान श्रीरामांना आदर्श मानून “धर्म ही माणसाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे”, असा संदेश लोकांना दिला. त्याच समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे.


सिनेमास्टर्स एंटरटेनमेंट प्रस्तुत, समर्थ क्रिएशन्स निर्मित, डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रामदास स्वामींवर आधारित चित्रपट 'रघुवीर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कॉमेडियन नवीन प्रभाकर सुद्धा यात फार महत्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा चित्रपट 19 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस भेटीस येणार आहे.  


गायक, अभिनेता आणि कॉमेडियन अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचाल करुन 'जुली - द बार गर्ल' आणि 'द ग्रेट इंडियन लाफ्टर'मधून घराघरात पोहोचलेला नवीन प्रभाकर याची नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही. अगदी काही आठवड्यांपूर्वीच आलेल्या श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव कलाकारांची फौज असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटात सुद्धा खलनायकाच्या भूमिकेत अगदी सहज अभिनय नवीन प्रभाकरने केला.






"सोहम" चित्रपटच्या निमित्ताने आपण नवीनला हटके भूमिकेतही बघितले. आता नव्याने येऊ घातलेल्या 'रघुवीर' या मराठी सिनेमामध्ये आपण नवीन प्रभाकरला एका खलनायकाच्या भूमिकेत बघणार आहोत. कॉमेडियन म्हणून दिलखुलास हसवल्यानंतर एक गंभीर भूमिकेत सुद्धा प्रभाकरांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आता कॉमेडियन ते व्हिलन या त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आपण होणार आहोत. 


नवीन प्रभाकरांबरोबरच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत म्हणजेच समर्थ रामदासांच्या भूमिकेत आपण विक्रम गायकवाड याना बघणार आहोत. त्याचबरोबर चित्रपटामध्ये ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने या गुणी कलाकारांची सुद्धा भूमिका आहे. एकंदरीत निलेश अरुण कुंजीर ह्यांचे दिग्दर्शन असलेला 'रघुवीर' पॉवरपॅक परफॉर्मन्सचा नजारा असणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bhramanti Song: समर्थ रामदास स्वामी यांची 'भ्रमंती'; 'रघुवीर' चित्रपटातील गाणं प्रदर्शित