Share Market Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला (Share Market Closing). बाजारात खरेदी असल्याने सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 545.25 अंकांनी वधारला. तर, निफ्टीत 181 अंकांनी वधारला. आज बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स 58,115.50 अंकांवर आणि निफ्टी 17,340.05 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रात खरेदीचा जोर असल्याने शेअर दर वधारले होते. फक्त फार्मा क्षेत्रात विक्रीचा जोर दिसून आला. त्याशिवाय, निफ्टी बँक, ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, सार्वजनिक बँका, खासगी बँका, रियल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसल्याने तेजी दिसून आली. आज शेअर बाजारातील 2230 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, 1145 कंपन्यांच्या शेअर दरात घट झाली आहे. त्याशिवाय 187 कंपन्यांच्या शेअर दरात कोणतीही घसरण झाली नाही.
सेन्सेक्समधील 30 पैकी 6 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय, इतर सर्व कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. सन फार्मा मोठी घसरण दिसून आली. त्याशिवाय, एचयूएल, इंडसंइड बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि टीसीएसच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून आला.
महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात चांगली तेजी दिसून आली. जवळपास 6 टक्क्यांनी शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. त्याशिवाय, पॉवरग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक बँक, मारुती, आयटीसी, विप्रो, टायटन, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या शेअर दरात चांगली वाढ झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- GST Collection : जुलै महिन्यात 1.49 लाख कोटींचा कर जमा, महाराष्ट्रातून सर्वाधिक करसंकलन
- Financial Changes From Today 1 August : आजपासून होणार 'हे' 7 मोठे बदल, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? जाणून घ्या...
- ITR Filing : शेवटच्या दिवशी 67 लाखांहून अधिक आयटी रिटर्न दाखल, आता दंडासह आयकर परतावा भरावा लागणार