Share Market Closing Bell : शेअर बाजारात मागील दोन दिवस सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत बंद झाले. आज सकाळीदेखील बाजारात घसरणीचे संकेत दिसत होते. मात्र, गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजार वधारला. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 547.83 अंकांनी, तर निफ्टी निर्देशांक 158 अंकांनी वधारला. दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा सेन्सेक्स 55816.32 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 16641.80 अंकांवर स्थिरावला.


आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा 1714 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. तर, 1521 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 136 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


आज सेन्सेक्सच्या 30 पैकी पाच शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टीमध्ये सन फार्मा, एसबीआय, एल अॅण्ड टी, डिवीज लॅब्ज, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. त्यामुळे शेअर दर वधारले. तर, भारती एअरटेल, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, युपीएल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात घसरण झाली. 


आज बाजारात तेजी असल्याने सर्व सेक्टरच्या निर्देशांकात तेजी दिसून आली. बँक, आयटी, मेटल, ऑइल अॅण्ड गॅस, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, फार्मा आदी सेक्टरमधील शेअरमध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.


आज सकाळी बाजाराची सुरुवात किंचिंत घसरणीसह झाली. बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टी निर्देशांकात 8.50 अंकांची घसरण होत 16,475 अंकांवर खुला झाला. तर, सेन्सेक्स निर्देशांकात 10.20 अंकांची घसरण होत  55,258  अंकांवर खुला झाला. खरेदी आणि विक्रीचा असा दोन्ही दबाब बाजारावर दिसून येत होता. मात्र, काही वेळेनंतर बाजारात खरेदीचा जोर वाढला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: