Adani Enterprises AGM 2022 :  भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे.  येत्या काळात अदानी समूह ऊर्जेमध्ये 70 अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असल्याची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Adani Group chairman Gautam Adani)  यांनी दिली आहे. गौतम अदानी  यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले


भारत जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा सर्वात मोठा देश 


गौतम अदानी शेअरधारकांना संबोधित करताना म्हणाले, सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू आयात करणारा देश आहे, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की, लवकरच भारत जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनेल.  जगातील प्रमुख सौर ऊर्जा निर्मिती करणा-या कंपन्यांच्या यादीमध्ये आम्ही याआधीच स्थान मिळविले आहे. या क्षेत्रातील आमच्या क्षमतेच्या आधारावर आम्हाला भविष्यात हायड्रोजन वायू  इंधन म्हणून वापरण्यासाठीच्या प्रयत्नांत मोठे योगदान देणार आहे.  खनिज तेल आणि वायू यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला देश ते भविष्यात  जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा निर्यात करणारा देश या भारताच्या परिवर्तनात आमची आघाडीची भूमिका असेल



वीज निर्मितीची क्षमता 300 टक्क्यांनी वाढली 


भारताने कोरोना काळात  ऊर्जा संकटाचा सामना केला.  2015 सालच्या तुलनेत पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून होणा-या वीज निर्मितीची क्षमता 300 टक्क्यांनी वाढली आहे 2020-21 च्या तुलनेत रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये 125  टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.   विजेच्या वाढीव मागणीपैकी 75 टक्क्यांहून जास्त मागणी पुनर्वापरक्षम स्रोतांपासून निर्मिली जात असून ही प्रगती रोखणे आता कोणालाही शक्य नाही, असे अदानी यावेळी म्हणाले.


अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटलायझेशन  200 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त 


डेटा सेंटर , डिजिटल सुपर अॅप आणि संरक्षण, विमान निर्मिती, धातू , आणि औद्योगिक सामग्री  यांसारख्या सरकारच्या आत्मनिर्भर भारत  धोरणाशी सुसंगत असणाऱ्या व्यवसायातही आम्ही प्रवेश केला आहे.   या वर्षी आमच्या ग्रुपचे मार्केट कॅपिटलायझेशन  200 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून अब्जावधी डॉलरचे भांडवल उभे  शकलो यातूनच भारत आणि अदानी समूहाबद्दल असलेला विश्वास दिसून येतो. अनेक परदेशी सरकारे आता आम्हाला त्यांच्या देशांत उद्योग काढून तेथील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आग्रह करत आहेत. यामुळेच 2022 या वर्षात आम्ही भारताच्या  सीमा ओलांडून इतर देशात व्यवसाय सुरू करणार आहे.  पुनर्वापरयोग्य ऊर्जेच्या बाबतीत आमचे जगातील स्थान बळकट होत असले तरी गेल्या 12 महिन्यांत इतर अनेक उद्योगात आम्ही लक्षणीय प्रगती साधली आहे. आम्ही आता देशातील सर्वात मोठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आहोत.  आमच्या  व्यवस्थापनातील विमानतळाच्या सभोवतीच्या परिसरात नवी वित्तीय केंद्रे वसविण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत, असे अदानी म्हणाले.     


2022 या वर्ष हे माझ्या वैयक्तिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्षी माझे वडिल शांतीलाल अदाणी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने अदानी कुटुंबाने  एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी 60,000 कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.