Share Market Closing Bell: सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात (Share Market) तेजी दिसून आली. अमेरिकेच्या महागाई दरात (US Inflation) घट झाल्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. आज, बँकिंग (Banking), आयटी (IT), मेटल्स (Metals) आणि एनर्जी (Energy) सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक तेजीसह बंद झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 144 अंकांच्या 62,678 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकांच्या तेजीसह 18,660 अंकांवर स्थिरावला. बँकिंगच्या स्टॉक्समध्ये खरेदीचा उत्साह दिसून आल्याने बँक निफ्टीने 44000 अंकांचा टप्पा ओलांडला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 9 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 34 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 16 कंपन्यांचे शेअर्स घसरले. निफ्टीमध्ये हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.40 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 2.07 टक्के, ओएनजीसीमध्ये 1.94 टक्के, यूपीएलच्या शेअर दरात 1.90 टक्के, आयशर मोटर्सच्या शेअर दरात 1.72 टक्क्यांची तेजी दिसून आली.
तर, नेस्ले इंडियाच्या शेअर दरात 1.62 टक्क्यांनी घसरण झाली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.28 टक्के, भारती एअरटेलमध्ये 1.09 टक्के, एशियन पेंट्समध्ये 0.96 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर दरात 0.86 टक्क्यांची घसरण दिसून आली.
बँक निफ्टीत तेजी
बँक निफ्टीने आज दिवसभराच्या व्यवहारात उच्चांक गाठला. बँक निफ्टी निर्देशांकाने 44,151.80 हा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 102 अंकांनी वधारत 44,049.10 अंकांवर व्यवहार करत होता.
मंगळवारी अमेरिकेतील नोव्हेंबर महिन्यातील महागाई दराचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील महागाईचा दर हा 12 महिन्यातील सर्वात कमी दर 7.1 टक्के इतका नोंदवण्यात आला. आज अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याज दराची घोषणा करण्याची शक्यता आहे. महागाई दर घटल्याने कदाचित फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर स्थिर ठेवले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: