मुंबई : शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. या कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचं बाजारमूल्य पाच दिवसात 47000 कोटींनी वाढलं. म्हणजेच रिलायन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी 47000 कोटी रुपयांची कमाई केली. दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या सारख्या दिग्गज कंपन्यांचं बाजारमूल्य घटल्यानं त्यांच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला.
Reliance Investors : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल
सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांचं बाजार मूल्य वाढलं. रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, एलआयसीचा समावेश आहे. या चार कंपन्यांचं बाजारमूल्य 95447 कोटी रुपयांनी वाढलं. दुसरीकडे एचडीएफसी बँक, टिसीएस, आयसीआयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, हिंदूस्थान यूनिलीव्हर या कंपन्यांचं बाजारमूल्य 91685.94 कोटी रुपयांनी घटलं.
मुकेश अंबानीच्या नेतृत्त्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 47000 कोटी रुपयांनी वाढल्यानं पुन्हा एकदा 20 लाख कोटींच्या पुढं पोहोचलं आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 20,11,602.06 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. पाच दिवसात रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी 47431.32 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 30091.82 कोटी रुपयांनी वाढून 864908.87 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 14540.37 कोटी रुपयांनी वाढून 1171554.56 कोटी रुपयांवर पोहोचलं. तरस एलआयसीचं बाजारमूल्य 3383.87 कोटी रुपयांनी वाढून 565897.54 कोटी रुपयांवर पोहोचलं.
बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घटलं. बाजारमूल्य कमी होण्याच्या बाबतीत इन्फोसिस, हिंदूस्थान युनीलीव्हर, एचडीएफसी बँक, टीसीएस असा क्रम आहे. बाजारमूल्याच्या हिशोबानं रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वा मोठी कंपनी आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, एअरटेल, टीसीआस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, इन्फोसिस, हिंदूस्थान यूनीलिव्हर आणि एलआयसी असा क्रम आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)