Bahubali The Epic 2nd day box office collection: एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द एपिक’ या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. ‘थामा’ आणि ‘एक दीवाने की दीवानियत’ या दोन नवीन चित्रपटांच्या चर्चेत असतानाही ‘बाहुबली’ने आपल्या कमाईचा जोरदार डंका वाजवला आहे. फक्त दोन दिवसांतच या चित्रपटाने 20 कोटींचा टप्पा पार केला असून, पुन्हा रिलीज झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Bahubali the epic)

Continues below advertisement


बाहुबली : द एपिक’ मध्ये जोडले पूर्वी नसलेले सिन्स ...


‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ नंतर, दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी ‘बाहुबली : द एपिक’ या नावाने काही नवीन सीनसह हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज केला आहे. 31ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात पूर्वी डिलीट केलेले काही खास सीन प्रेक्षकांना दाखवण्यात आले आहेत. राजमौलींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कापलेल्या सिन्सविषयी बातचीत केली. प्रभास आणि राणा दग्गुबाती यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये, राजामौली यांनी या आवृत्तीसाठी वगळण्यात आलेल्या दृश्यांवर भाष्य केले.



ते म्हणाले," दोन्ही भाग एकत्र करून आणि रोलिंग शीर्षके काढून टाकून, एकूण कालावधी सुमारे पाच तास आणि 27 मिनिटे झाला असता. सध्याची आवृत्ती तीन तास आणि 43मिनिटे चालते. अवंतिकाची शिवुडूसोबतची प्रेमकहाणी, 'पाचा बोटेसिना', 'कन्ना निदुरिंचरा' आणि 'इरुकुपो' ही गाणी काढून टाकण्यात आली आहेत. युद्धाच्या भागातील अनेक दृश्ये देखील कमी करण्यात आली आहेत," राजामौली म्हणाले.



दोन दिवसांची कमाई


बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘बाहुबली : द एपिक’ने वर्ल्डवाइड 27.85 कोटींची कमाई केली आहे, तर भारतातील कमाई 17.9 कोटींवर पोहोचली आहे.


प्री-रिलीज शोज: ₹1.15 कोटी
पहिला दिवस: ₹9.65 कोटी
तेलुगू – ₹7.9 कोटी
हिंदी – ₹1.35 कोटी
कन्नड – ₹2लाख
तमिळ – ₹2लाख
मल्याळम – ₹18 लाख
दुसरा दिवस:₹7 कोटी
एकूण भारतात दोन दिवसांची कमाई ₹17.9कोटी, तर जागतिक स्तरावर ₹27.85कोटी!


‘थामा’चा 12 दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट


आयुष्मान खुराना अभिनित ‘थामा’ या चित्रपटाने 12व्या दिवशी ₹4.8कोटींची कमाई केली असून, भारतात एकूण ₹115.9कोटी तर वर्ल्डवाइड ₹155.25कोटींची कमाई गाठली आहे. चित्रपटाचा बजेट ₹145कोटी होता, म्हणजेच चित्रपटाने आपला खर्च भरून काढला आहे.


‘एक दिवान्याची दिवानगी’चाही फायदा


हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दीवाने की दीवानियत’या चित्रपटाने 12 व्या दिवशी ₹3.15कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील एकूण कमाई ₹60.65कोटी, तर वर्ल्डवाइड ₹78.5कोटी इतकी झाली आहे. या चित्रपटाचा बजेट फक्त ₹30कोटी असल्याने निर्मात्यांना दुप्पट नफा झाला आहे.


जगभरात 1,150 पेक्षा जास्त स्क्रीनवर री-रिलिज


‘बाहुबली: द एपिक’ फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील 1,150 हून अधिक सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे. अमेरिकेत 400 पेक्षा जास्त स्क्रीन, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये 210 स्क्रीन, तसेच UAE, ऑस्ट्रेलिया आणि साउथ ईस्ट एशिया मधील अनेक ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे. बाहुबली द एपिकला देशातच नाही तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.