IND W vs SA W Final World Cup 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना (IND W vs SA W Final World Cup 2025) आज 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवला जाईल. टीम इंडिया विश्वचषकाचा तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळत आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा इतिहासातील हा पहिलाच एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना आहे. दोन्ही संघांपैकी एक आज आपले पहिले विजेतेपद जिंकेल, अन्यथा दुसऱ्या संघाला निराशेचा सामना करावा लागेल. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 बाबत 5 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

Continues below advertisement

1. विजेत्या संघाला किती पैसे मिळतील? (Women World Cup 2025 Winner Prize)

यंदा विजेत्या संघाला मागील आवृत्तीपेक्षा खूप जास्त बक्षीस रक्कम मिळेल. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बक्षीस रकमेची घोषणा केली. ही रक्कम पुरुष विश्वचषक विजेत्या संघापेक्षाही जास्त आहे. 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल, जी अंदाजे ₹40 कोटी आहे. आज पराभूत होणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष (अंदाजे ₹20 कोटी) मिळतील.

2. भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देण्याच्या तयारीत- (IND W vs SA W Final World Cup 2025)

पीटीआयच्या वृत्तानुसार, जर भारतीय महिला क्रिकेट संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना जिंकला, तर बीसीसीआय त्यांना 125 कोटी रुपयांचे मोठे बक्षीस देण्याची तयारी करत आहे. बीसीसीआय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला पुरुष संघाइतकेच बक्षीस देण्याचा मानस आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्यावर विश्वास ठेवते. म्हणूनच, जर आमच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला तर त्यांचे बक्षीस पुरुष संघापेक्षा कमी नसावे, यावर आम्ही चर्चा केली. दरम्यान, जेव्हा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा बीसीसीआयने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा मोठा बोनस दिला होता. जर महिला संघाने यावेळी विजेतेपद जिंकले तर त्यांना समान रक्कम म्हणजे 125 कोटी रुपये देणे हे भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक पाऊल असेल. (BCCI ON IND W vs SA W Final World Cup 2025)

Continues below advertisement

3.स्मृती मानधना 2025 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू बनू शकते- (Smriti Mandhana)

स्मृती मानधना या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू आहे. स्मृतीने आठ सामन्यांमध्ये 389 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. वोल्वार्ड्टने आठ सामन्यांमध्ये 470 धावा काढल्या आहेत. स्मृती मानधना आज शतक करून यादीत अव्वल स्थान मिळवू शकते.

4. मारिझान कापची एतिहासिक कामगिरी- (Marizanne Kapp)

दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मारिझान काप महिला विश्वचषकात 50 विकेट्स घेण्याच्या जवळ आहे. मारिझान कापने सेमीफायनलमध्ये पाच विकेट्स घेतल्या आणि विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनली. सध्या मारिझान कापने 44 विकेट्स पटकावल्या आहेत. 

5. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अंतिम सामना- (IND W vs SA W Final World Cup 2025)

महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड अंतिम फेरीत असणार नाही. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

संबंधित बातमी:

Who Is Amol Muzumdar IND W vs SA W Final World Cup 2025: तेंडुलकर, द्रविडमुळे संधी हुकली, 11 हजार धावा करणारा खेळाडू आता वर्ल्ड कप जिंकून देणार?; कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?