मुंबई : शेअर बाजारात (Share Market) असे काही शेअर असतात जे शांतीत क्रांती करून जातात. काही शेअर्स अगदी कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चौपट, पाचपट नफा मिळवून देतात. सध्या अशाच एका पेनी स्टॉकची सगळीकडे चर्चा होत आहे. या पेनी स्टॉकमध्ये (Penny Stock) गुंतवणूक करणारे अवघ्या पाच दिवसांत मालामाल झाले आहेत. सध्या चर्चा होत असलेल्या या शेअरचे नाव आहे लिडिंग लिजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट. या शेअरचे मूल्य सध्या पाच रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 71 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. पाच दिवसांत या कंपनी शेअर 71.74 टक्क्यांनी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हा शेअरची गेल्या काही दिवसांपासूनची स्थिती काय आहे? हे जाणून घेऊ या.
लिडिंग लिजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेट या कंपनीच्या शेअरचे मूल्य 13 मे 2024 रोजी 2.30 रुपये होते. पाच दिवसांनी म्हणजेच 18 मे 2024 रोही हा शेअर 3.95 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य हे 4.01 तर गेल्या 52 आठवड्यांतील सर्वांत कमी मूल्य हे 1.72 रुपये राहिलेले आहे.
एका महिन्यात शेअरमध्ये 82 टक्क्यांची वाढ
लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट (Leading Leasing Finance) या कंपनीच्या शेअरमध्ये एका महिन्यात 82 टक्के वाढ झालेली आहे. या कंपनीचा शेअर 22 एप्रिल 2024 रोजी 2.17 रुपये होता. आता 18 मे 2024 रोजी हा शेअर 3.95 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 10 दहा दिवसांत या कंपन्याच्या शेअर्समध्ये 77 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या कंपनीचा एक शेअर 7 मे 2024 रोजी 2.24 रुपयांवर होता. आज 18 मे 2024 रोजी याच कंपनीच्या शेअरचे मूल्य थेट 3.95 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
2 महिन्यांत 120 टक्क्यांनी वाढ
लीडिंग लीजिंग फायनान्स (Leading Leasing Finance) या कंपनीच्या शेअरचे मूल्य गेल्या 2 महिन्यांत थेट 120 टक्क्यांनी वाढलेले आहे. या कंपनीचा शेअर 27 मार्च 2024 रोजी 1.80 रुपयांवर होता. आता 18 मे 2024 रोजी हा शेअर चार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यात या पेनी स्टॉकमध्ये 83 टक्क्यांची वाढ झाली आहे.15 फेब्रुवारी 2024 रोजी हा शेअर 2.16 रुपयांवर होता. आता मात्र लवकरच चार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रआतील तज्ज्ञांच्या मतानुसार या शेअरमध्ये या वर्षात साधारण 72 टक्क्यांपर्यंत तेजी दिसू शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
क्लेम सेटलमेंटबाबत EPFO चा नवा नियम, 'या' निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार!
करोडपती व्हायचंय? मग फक्त 'हा' एक फॉर्म्यूला पाळा, नक्की पडेल पैशाचा पाऊस!
करोडपती व्हायचंय? मग फक्त 'हा' एक फॉर्म्यूला पाळा, नक्की पडेल पैशाचा पाऊस!