मुंबई : देशभरात प्रसिद्ध असलेल्या सीएसआर जर्नल एक्सलेन्स अवॉर्ड 2024 (CSR Journal Excellence Awards) हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्होकेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लोटस बॉलरूम गेट- 18 येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 


उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्या, संस्थांना मिळणार पुरस्कार 


कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबलिटीअंतर्गत उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांना सीएसआर जर्नल एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित केले जाते. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण, शेती आणि ग्रामविकास, आरोग्य आणि स्वच्छता, खेळ या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा आजच्या कार्यक्रमात सत्कार होणार आहे. 


कोणकोणत्या संस्था अंतिम फेरीत


एचडीएफसी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणारी एचडीएफसी बँक लिमिटेड, काश्मीर सुपर 50 मोहीम राबवणारे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, अॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर प्रोगार राबवणारे अॅमेझॉन इंडिया, हर्बल किंग्डम हा कार्यक्रम राबवणारे डाबर इंडिया लिमिटेड,  व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवणारे फायनॅन्शियल इन्स्टिट्यूशनल सेक्यूरिटीज लिमिटेड आदी संस्था या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत.  


अन्य संस्थादेखील अंतिम फेरीत


जवाहर इंटिग्रिटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी इंडसइंड बँक लिमिटेड, जलधारा 6 या प्रकल्पासाठी कोका कोला इंडिया फाऊंडेशन, वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी व्हीएफएस ग्लोबल, दुर्गन छेवू लेक ट्रान्सफॉर्मेशनसाठी माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT, हेल्थ केअर प्रोजेक्ट मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल या प्रकल्पासाठी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या संस्थांदेखील पुरस्कारासाठी अंतिम स्पर्धकांच्या यादीत आहेत.


कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार?


दरम्यान, या कार्यक्रमाल वर उल्लेख लेलेल्या कंपन्यांसह इतरही अनेकांनी अर्ज केले होते. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला इंडियन ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षा पीटी उशा, सुनिल छेत्री, आदित्य बिर्ला एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष नीरज बिर्ला, अभिनेत्री दिया मिर्झा, आयुष्मान खुराना आदी प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहतील. हा पुरस्कार The CSR Journal या प्रिंट आणि डिजिटल न्यूज ऑर्गनायझेशन तर्फे दिला जाणार आहे.


हेही वाचा :


अंबानी, अदाणी, टाटांपेक्षा हजार पटीने श्रीमंत, जिच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घ्यायचं 'ती' महाराणी कोण?


दिवळी ते ख्रिसमस, तीन महिन्यांत शेअर बाजार 'या' दिवशी बंद असणार; एक दिवस होणार स्पेशल ट्रेडिंग!


मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमवतात? त्यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं म्हटल्यावर लागतील पावणे दोन कोटी वर्षे!