share market news: शेअर बाजारात मागील आठवड्यातील चढ-उतारात सेन्सेक्समधील 10 पैकी 8 कंपन्यांचे मार्केट कॅपिटल (बाजार भांडवल) 1,18,930.01 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या दरम्यान सर्वाधिक फायदा टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) आणि भारतीय स्टेट बँकच्या (SBI) शेअरधारकांना झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपिटलमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 760.69 अंकानी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारला.
मागील आठवड्यात शेअर बाजारात एक दिवसाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. तर, शुक्रवारी बलिप्रतिपदेच्यानिमित्ताने बाजारातील व्यवहार बंद होते.
या आठवड्यात टीसीएसचा मार्केट कॅप 40, 782.04 कोटी रुपयांहून वाढून 12,98,015.62 कोटी रुपयांपर्यंत पोहचला होता. तर, एसबीआयच्या मार्केट कॅपमध्ये 25,033.54 कोटी इतकी वाढ झाली. एकूण मार्केट कॅपिटल 4,73,406.02 कोटी इतके झाले.
इन्फोसिस, एचडीएफसीलाही झाला फायदा
त्याशिवाय इन्फोसिसच्या मार्केट कॅपिटलमध्ये 17,158.49 कोटींनी वाढून 7,18,890.08 कोटी इतके झाले. तर, एचडीएफसीचे मार्केट कॅपिटल 10,153.08 कोटी रुपयांच्या वाढीसह 5,24,370.77 कोटी इतके झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात 24,612.17 कोटींनी घट होऊन 15,85,074.58 कोटी रुपये इतके झाले. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलात 13,680.32 कोटींनी घट होऊन 5,42,827.39 कोटी इतके झाले.
टॉप-10 मध्ये या कंपन्यांचा समावेश
टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानी कायम राहिली. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, बजाज फायन्सास, कोटक महिंद्रा बँक आदींचा समावेश होता.
संंबंधित बातम्या:
Mukesh Ambani : मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होणार? रिलायन्स समूहाने दिली 'ही' माहिती
Paytm : आयपीओ आधीच पेटीएमची दिवाळी! गुंतवणूकदारांकडून जमवले 8235 कोटी रुपये