Sooryavanshi Rooftop Drive: 'सूर्यवंशी' सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही सिनेमात विशेष भूमिका आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 23.85 कोटींची कमाई केली होती. देशातील एकमेव रुफटॉप ड्राइव्ह इन सिनेमागृहाचे आज मुंबईत उद्घाटन झाले. या सिनेमागृहात प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' हा पहिला सिनेमा ठरला आहे.
हे सिनेमागृह मुंबईतील बिकेसीजवळील वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमधील गच्चीवर बांधण्यात आले आहे. या सिनेमागृहाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. दरम्यान रोहित शेट्टी म्हणाला, माझा सूर्यवंशी सिनेमा देशातील एकमेव अद्वितीय रुफटॉप ड्राइव्ह इन सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा आहे. याचा मला आनंद होत आहे. तसोच रोहितने सूर्यवंशी सिनेमाला चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल जाहीर आभार मानले.
या देशातील पहिल्या रुफटॉप ड्राइव्ह इन सिनेमागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी 290 कार पार्क केल्या जाऊ शकतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद घेता येईल. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट देशभरात जवळपास चार हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. तर जगभरात 5200 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
तुमचा विकेण्ड अधिक खास करायचा आहे? तर मग ओटीटीवर 'हे' चित्रपट पहाच...
'सूर्यवंशी' सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. हा एक नाट्यमय सिनेमा आहे. चित्रपटात तिन्ही कलाकार पोलीसाची भूमिका साकारत आहेत. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात भन्नाट स्टंट पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सर्व बंद असल्याने हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला नव्हता. पण आता प्रेक्षक प्रतिक्षा करत असलेला 'सूर्यवंशी' प्रदर्शित झाला आहे.