Sensex Closing Bell :  मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी (Share Market Closing Bell) फारसा उत्साहवर्धक राहिला नाही. शेअर बाजार (Share Market) किरकोळ घसरणीसह बंद झाला.  एफएमसीजी (FMCG), मेटल्स (Metals)  क्षेत्रातील शेअर्सच्या घसरणीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक  सेन्सेक्स (BSE Sensex) 130 अंकांनी घसरून 65,826 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NSE Nifty) 27 अंकांनी घसरून 19,570 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर ऑईल अॅण्ड गॅस, हेल्थकेअर, इन्फ्रा, कमोडिटी, मेटल्स, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉल शेअर्समध्ये पुन्हा खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30  शेअर्सपैकी 10 तेजीसह बंद झाले. निफ्टी निर्देशांकातील 50 शेअर्सपैकी 19 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

 

इंडेक्‍सकिती अंकांवर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex65,846.5066,057.5365,752.63-0.16%
BSE SmallCap35,248.9735,341.3735,064.530.25%
India VIX11.3311.5311.102.00%
NIFTY Midcap 10037,912.5037,984.0537,578.750.23%
NIFTY Smallcap 10011,755.9511,779.6011,664.200.27%
NIfty smallcap 505,336.755,343.305,286.000.34%
Nifty 10019,497.4519,560.5519,450.10-0.12%
Nifty 20010,370.6010,401.9010,336.20-0.07%
Nifty 5019,570.8519,634.4019,533.10-0.13%

 

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत किरकोळ वाढ

आज शेअर बाजारात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांच्या  संपत्तीत किरकोळ वाढ झाली असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 305.39 लाख कोटी रुपयांवर पोहचले. मागील ट्रेडिंगच्या दिवशी 305.35 लाख कोटी रुपये इतके होते. आज बाजार भांडवलात 4000 कोटींची वाढ झाली. 

कोणत्या स्टॉक्समध्ये तेजी-घसरण 

आज दिवसभरातील व्यवहारात टेक महिंद्रा 1.82 टक्के, विप्रो 1.34 टक्के, बजाज फायनान्स 0.98 टक्के, एसबीआय 0.89 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 0.58 टक्के, बजाज फिनसर्वच्या शेअर दरात 0.56 टक्के, टायटनमध्ये 0.55 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 0.49 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

1813 समभाग वधारले

मुंबई शेअर बाजारात (BSE) सूचीबद्ध असलेल्या स्टॉक्सपैकी बहुतांशी शेअर्स आज तेजीसह बंद झाले. आज एकूण 3,755 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,813 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1,802 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 140 समभाग कोणतेही चढ-उतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 271 शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 32 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 

इतर संबंधित बातमी: