Share Market Closing Bell: आज भारतीय शेअर बाजारात (Share Market News) अस्थिरता दिसून आली. व्यवहाराच्या मागील तीन दिवसांत विक्रीचा सपाटा सुरू असल्याने बाजारावर दबाव असल्याचे चित्र आहे. गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू आहे. त्याच्या परिणामी आज शेअर बाजारातील व्यवहार थांबवले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 29.07 अंकांच्या घसरणीसह 66,355.71 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 8.25 अंकांच्या तेजीसह 19,680 अंकांवर स्थिरावला. बाजारात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 

बँकिंग, एफएमसीजी आणि आयटी सेक्टरमधील शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम बाजारावर झाला. या तिन्ही क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. ऑटो, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, कमोडिटी, इन्फ्रा, एनर्जी, मेटल्स फार्मा  सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकाने तेजी दिसून आली. तर स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 13 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 25 समभाग वधारले. 


कोणते शेअर्स वधारले-घसरले 

आज दिवसभरातील व्यवहारात जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 3.33 टक्के, टाटा स्टीलमध्ये 3.25 टक्के, एनटीपीसी 2.45 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 2.12 टक्के, टाटा मोटर्समध्ये 1.62 टक्के, टायटन कंपनीमध्ये 1.62 टक्के, पॉवरग्रीड 1.39 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रात 1.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, एशियन पेंट्सच्या शेअर दरात 3.95 टक्के, आयटीसीमध्ये 1.85 टक्के, लार्सनमध्ये 1.51 टक्के, एसबीआयमध्ये 1.27 टक्के, कोटक महिंद्रा मध्ये 1.12 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकावर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 66,355.71 66,559.29 66,177.62 -0.04%
BSE SmallCap 34,279.08 34,435.59 34,234.28 0.31%
India VIX 10.24 11.65 10.11 -12.10%
NIFTY Midcap 100 36,887.65 36,944.85 36,655.25 0.39%
NIFTY Smallcap 100 11,558.90 11,648.05 11,544.55 -0.11%
NIfty smallcap 50 5,187.35 5,232.25 5,179.85 -0.17%
Nifty 100 19,566.90 19,593.75 19,491.05 0.14%
Nifty 200 10,361.90 10,375.75 10,318.35 0.17%
Nifty 50 19,680.60 19,729.35 19,615.95 0.04%


गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 69 हजार कोटींची वाढ 

आज मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 25 जुलै रोजी 302.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवार, 24 जुलै रोजी 301.97 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 69 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 69 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

1,795 समभाग घसरले

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये आज तेजीपेक्षा घसरण झालेल्या शेअर्सची संख्या जास्त आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,679 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,744 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1,795 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 140 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणत्याही बदल झाला नाही.  याशिवाय आजच्या व्यवहारात 202 शेअर्सला अप्पर सर्किट लागले. त्याच वेळी, 230 शेअर्सना लोअर सर्किट लागले.