Share Market Updates : शेअर बाजारातील व्यवहार आज घसरणीसह सुरू झाला. सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 200 अंकांनी घसरून 58,581 वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 17,492 अंकांवर व्यवहार करत होता. ऑटो आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. घसरणीनंतर पुन्हा सावरण्यासाठी सेन्सेक्स आणि निफ्टीतील कंपन्यांना संघर्ष करावा लागत होता. 


अमेरिकन शेअर बाजारातील घसरण काही प्रमाणात थांबल्यानंतर आशियाई बाजारदेखील सावरला. अॅपलने तिमाही निकालात विक्रमी विक्री केली असल्याचे जाहीर केले. तासाभरानंतर अॅपलचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले. 


निफ्टी 100 चा निर्देशांक 0.43 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे स्मॉल कॅपमधील शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. 





निफ्टीमध्ये हिरो मोटोकॉर्पचा शेअर 1.26 टक्क्यांनी घसरला होता. 'हिरो'चा शेअर 2746.65 रुपयांवर व्यवहार करत होता. एचसीएल टेक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली.


ओएनजीसी, टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारले.


सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी टीसीएस, टायटन, विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली. 


दरम्यान, टाटा स्टील, श्री सिमेंट, बँक ऑफ इंडिया, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि वन 97 कम्युनिकेशन्स (Paytm) या कंपन्यांचे येत्या काही दिवसात तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. 


गुरुवारी तीन सत्रापासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला होता. गुरुवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 770.31 अंकांनी घसरला तर निफ्टीही 219.80 अंकाची घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,788.02 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,560.20 वर पोहोचला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha