Share Market Updates : शेअर बाजारात आजही अस्थिर वातावरण दिसण्याचे संकेत आहे. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला होता. मात्र, त्यानंतर काही वेळेतच त्यात घसरण झाली. 

आज शेअर बाजाराची  सुरुवात झाली तेव्हा निफ्टी 79.20 अंकाच्या तेजी खुला झाला. निफ्टी 16105 अंकावर व्यवहार करत होता. त्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकात 201.58 अंकाची तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 53950.94 अंकावर सुरू झाला. त्यानंतर शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागला. त्याच्या परिणामी घसरण सुरू झाली. सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 213 अंकाची घसरण झाली. यावेळी सेन्सेक्स 53535 अंकावर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 84.60 अंकाची घसरण दिसत असून 15941 अंकावर व्यवहार करत आहे. 

आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर निफ्टीतील 50 पैकी 35 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 15 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. बँक निफ्टीमध्ये 300 अंकाची उसळण दिसून आली असून 34640  अंकावर व्यवहार करत आहे. 

बीपीसीएलच्या शेअर दरात 2.21 टक्के आणि ओएनजीसीच्या शेअर दरात 2.13 टक्क्यांची घसरण दिसून आली. युपीएलमध्ये 1.57 टक्क्यांची घसरण दिसून आली. एशियन पेंट्समध्ये 1.14 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

ऑटो, एफएमसीजी, मेटल, रियल्टी, ऑइल अॅण्ड गॅसच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे. तर, वित्तीय सेवा क्षेत्र, बँक आणि आयटी निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. 

बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 303 अंकानी, तर निफ्टीही 99 अंकानी घसरला होता. सेन्सेक्स निर्देशांक 53,749 वर बंद झाला. निफ्टी 16,025 अंकावर बंद झाला. बुधवारी 696 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 2548 शेअर्समध्ये घसरण झाली होती. 109 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: