मुंबई : कोरोना काळात मंदीत गेलेली अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने भारतीय मार्केटकडे आता गुंतवणूकदारांच्या नजरा पुन्हा एकदा वळत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता असून येत्या डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 70 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याचं मॉर्गन स्टॅनलेने (Morgan Stanley) आपल्या अहवालात म्हटलं आहे.
मॉर्गन स्टॅनलेच्या रिपोर्टनुसार, येत्या डिसेंबरपर्यंत शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर वधारणार असून सेन्सेक्स 70 हजारांचा आकडा पार करणार आहे. पण यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली सुधारणा आणि नियंत्रित कोरोना परिस्थिती कायम राहणं आवश्यक आहे.
याचा अर्थ भारतातील परकीय गुंतवणूक वाढून ती दोन हजार कोटी डॉलर्स इतकी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण, कच्च्या तेलाच्या कमी किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती या गोष्टी जर सुलभ राहिल्या तर सेन्सेक्स 70 हजारांवर जाण्यास काहीच अडचण नसल्याचं मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटलं आहे.
या सेक्टरमध्ये भरभराट होणार
मॉर्गन स्टॅनले आपल्या अहवालात 2022 साली भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणक होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या क्षेत्रातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे याची माहिती दिली आहे. त्यामध्ये क्लीन एनर्जी, डिफेन्स सेक्टर, रिअल इस्टेट, ऑटो, फायनान्शिएल, इन्शुरन्स, डिजिटल ट्रान्फॉर्मेशन, हायपर लोकल ट्रान्फॉर्मेशन या सेक्टरवर गुंतवणूकदारांनी फोकस केला पाहिजे. या सेक्टरमध्ये जास्त विकास होण्याची शक्यता असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 198 अंकांनी वधारला
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1170 अंकाची घसरण
- PayTM IPO पेटीएमच नव्हे तर या 10 कंपन्यांच्या IPO चा फुटला होता फुगा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha