मुंबई : SEBI ने 15,000 हून अधिक वेबसाइट आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर बंदी घातली आहे.सोशल मीडियावर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत लोकांना चुकीचे सल्ले दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं जे गुंतवणूकदार यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून शेअर खरेदी करतात किंवा विकतात त्यांना सावध राहण्याची गरज आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सल्ला देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवर सेबीनं का कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी एका इन्फ्लुएन्सरवर कारवाई देखील झाली होती. आता सेबीनं आणखी 15 हजार वेबसाइट आणि काही सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स म्हणून काम करणाऱ्यांवर बंदी घातली आहे.
सेबीचा दणका?
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर जे चुकीची माहिती लोकांना दिशाभूल करतात त्यांच्यावर सेबीनं कारवाई केली आहे. सेबीनं अशा 15 हजार वेबसाइटस आणि इन्फ्लुएन्सर्सवर बंदी आणली आहे. या लोकांनी सोशल मीडियावर गुंतवणुकीचे चुकीचे सल्ले देऊन लोकांची दिशाभूल करत त्यांचं नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
SEBI नं कुणावर केली कारवाई?
सेबीनं काही दिवसांपूर्वी नामांकित वित्तीय इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती, नसीरुद्दीन अन्सारी यांच्यावर बंदी घालण्यात आहे. अन्सारी Baao of Chart या त्यांच्या एक्स अकाऊंटवर सक्रीय होते. तिथे ते शेअर खरेदी करणे आणि विकण्याबाबतचे सल्ले द्यायचे. सेबीनं अन्सारी त्यांच्या सहकाऱ्यांना एस्क्रो अकाऊंट काढून त्यात 17 कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं आहे. ही रक्कम गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी वापरली जाईल. याशिवाय अन्सारीवर 10 लाखांचा दंड लावण्यात आला. अन्सारीचे सहकारी ज्यामध्ये पदमती, तबरेज अब्दुल्ला, वाणी आणि वामशी यांच्यावर 2 लाखांचा दंड लावण्यातआला आहे. शुभांगी रविंद्र भारती, राहुल अनंत गोसावी, धनश्री चंद्रकांत गिरी यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
SEBI च्या चौकशीत समोर आलं की या इन्फ्लुएन्सर्सने कोणताही डिस्क्लेमर न लावता विशेष स्टॉक प्रमोट केले. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी संबंधित कंपन्यांकडून पैसे घेतले. त्या बदल्यात ते स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली. यामुळं गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली. बाजारात स्टॉक्सच्या किमतीत वाढ झाली. मात्र, हे बाजार नियमांचं उल्लंघन करणार होतं.
इन्फ्लुएन्सर्सची वाढती क्रेझ
सोशल मीडियावर अलीकडच्या काही काळात आर्थिक गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्सनची क्रेझ वाढत आहे. ते सोशल मीडिया स्टार्स लोकप्रिय होत आहेत. हे लोकं शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासंदर्भातील रणनीती सांगण्याबाबत दावे करतात. काही इन्फ्लुएन्सर्स योग्य माहिती देतात. काही लोक त्यांच्या फॉलोअर्सनं ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. यामुळे सेबीनं गुंतवणूकदारांना सल्ला दिलाय की मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या, सोशल मीडियावर दिलेल्या सल्ल्याची पडताळणी न करता गुंतवणूक करणं जोखमीचं असू शकतं.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)