SEBI मुंबई : शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या चेअरमन माधबी पुरी बुच यांनी म्यूचुअल फंडातील गुंतवणुकीसाठी 250 रुपयांची एसआयपी योजना लवकरच सुरु करणार असल्याचं म्हटलं. लवकरच शेअर बाजारात 250 रुपये दरमहा अशी एसआयपी सुरु करणार असल्याचं त्या म्हणाल्या. या योजनेमुळं समाजातील प्रत्येक वर्गातील लोक गुंतवणुकीसोबत जोडले जातील. 250 रुपयांची एसआयपी सुरु करण्यासाठी म्यूचुअल फंड इंडस्ट्रीचं देखील सहकार्य असल्याचं त्या म्हणाल्या. माधवी पुरी म्हणाल्या 250 रुपयांमध्ये स्टारबक्समध्ये कॉफी देखील मिळत नाही.  


250 रुपयांची एसआयपी यशस्वीपणे चालवणार


सीआयआयच्या एका कार्यक्रमात माधवी पुरी बुच यांनी 250 रुपयांच्या एसआयपी विषयी भाष्य केलं. ही संकल्पना फक्त छोट्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी आणलेली नसून तंत्रज्ञानाच्या मदतीनं लोकांना कमी किमतीत फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. 250 रुपयांची एसआयपी यशस्वी करण्यासाठी असोसिएशन ऑफ म्युचुअल फंडस इन इंडियासह या क्षेत्रातील इतर घटकांची मदत घेतली जाणार आहे. ही योजना सुरु होईल मात्र आमचा प्रयत्न ती यशस्वीपणे चालवण्याचा आहे, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.  


आदित्य बिर्ला सन लाईफ म्युचुअल फंडचा पुढाकार


बिजनेस टुडेच्या एका रिपोर्टनुसार 250 रुपयांची एसआयपी विकसित करण्यामध्ये आदित्य बिर्ला सन लाईफ म्युचुअल फंड कडून पुढाकार घेण्यात आल्याची माहिती आहे. जर ही योजना यशस्वी ठरल्यास एखाद्या फंड हाऊसकडून असा पुढाकार घेणं पहिला प्रयत्न ठरेल. मात्र, या रिपोर्टला दुजोरा देण्यात आलेला नाही. माधबी पुरी बुच म्हणाल्या जगाला या 3 डॉलर्स म्हणजेच 250 रुपयांच्या गुंतवणुकीमुळं आश्चर्याचा धक्का बसु शकतो. 250 रुपयांच्या गुंतवणुकीसह लोक केवळ विकासाचा प्रवास सुरु करणार नाहीत तर विकसित भारताच्या स्वप्नासाठी देखील योगदान देतील, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.  


शेअर मार्केटमध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका


सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी शेअर मार्केटमध्ये पुढील टप्पा आव्हानात्मक असल्याचं म्हटलं. या आव्हानांना तोंड देण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेअर मार्केटला सुरक्षित केल्याचं बुच म्हणाल्या. शेअर मार्केट नियंत्रक आणि स्टेक होल्डर्समध्ये चांगले संबंध असणं आवश्यक आहे. आपण एकमेकांना सहकार्य करुन आपलं मार्केट पुढं नेऊ शकतो, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.


इतर बातम्या : 


निवृत्तीनंतर खिशात असतील तब्बल 1 कोटी रुपये, नोकरीवर असताना फक्त 'हा' फंडा वापरा!


आता प्रत्येकजण होणार उद्योजक, फक्त 4 टक्क्यांनी मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज, सरकारची 'बीज भांडवल योजना' आहे तरी काय?