मुंबई : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असतो. निवृत्त झाल्यानंतर चरितार्थ कसा करायचा? असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना तर भविष्याचं नियोजन करण्यासाठी योग्य मार्ग सापडत नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात आरामात आयुष्य काढायचे असेल तर योग्य ठिकाणी पैसे गुंतवावे लागतील. याच पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतर तुमच्याजवळ तब्बल एक कोटी रुपये राहतील, असा आगळावेगळा फंडा जाणून घेऊ या...
नोकरीला असताना निवृत्तीनंतरचं आयुष्य लक्षात घेता प्रत्येकाने पगारातील एक भाग जपून ठेवायला हवा. निवृत्तीसाठी सध्या पगारातील किती पैसे जपून ठेवायला हवेत, हे नीट समजून घेतले पाहिजे. हे पैसे जपून ठेवताना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सध्या तुमचे उत्पन्न किती आहे? गुंतवणुकीवर धोका पत्करायची तुमची किती क्षमता आहे? निवृत्तीसाठी तुमच्याकडे आणखी किती कालावधी बाकी आहे? या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.
निवृत्ती लक्षात घेता, नेमकी कुठे गुंतवणूक करावी?
तुम्ही 20 वर्षांचे आहात आणि तुम्ही सध्या नोकरी करत आहात, असे गृहित धरल्यास तुमच्याकडे निवृत्तीसाठी आणखी बराच कालावधी शिल्लक आहे. तुम्ही 20 व्या वर्षापासूनच नोकरी करत असाल तर तुम्हाला बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी मोठा वावा मिळतो. अशा स्थितीत तुम्ही जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. त्यासाठी म्युच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठी योग्य मार्ग ठरू शकतो. वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही निवृत्तीसाठी नियोजन करत असाल तर गुंतवणूक करताना तुम्ही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही 40 व्या वर्षी निवृत्तीसाठी गुंतवणूक करत असाल तर स्थिर आणि सुरक्षित परतावा देणाऱ्या मंचावर तुम्ही गुंतवणूक करायला हवी.
निवृत्तीनंतर एक कोटी हवे असतील तर काय करावे?
निवृत्तीनंतर तुम्हाला एक कोटी रुपये हवे असतील तर त्यासाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीपर्यंत एक कोटी रुपयांचा फंड मिळवू शकता. 30 वर्षांत तुम्हाला 1 कोटींचा फंड उभा करायचा असेल तर तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करू शशकता. म्युच्यूअल फंडात गुंतवलेल्या रकमेवर वर्षाला 12 टक्क्यांनी परतावा मिळतो, असे गृहित धरले जाते. ही बाब लक्षात घेता एसआयपीचा मार्ग निवडून तुम्ही 30 वर्षात 1 कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता.
गुंतवणूक कशी करावी?
तुम्हाला 30 वर्षांत एक कोटी रुपये हवे असतील तर त्यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल. वर्षाला 12 टक्क्यांचा रिटर्न लक्षात घेत 30 वर्षांत तुम्ही साधारण 10,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल. मॅच्यूरिटीनंत तुम्ही गुंतवलेल्या या पैशांवर तुम्हाला 1,05,89,741 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 95,09,741 रुपयांचे व्याज मिळेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'हे' स्टॉक्स होणार एक्स डिव्हिडेंड!