State Bank of India Student Loan: वाढत्या महागाईबरोबरच शिक्षणावरील खर्चही झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत पालकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण झाले आहे. अशातच मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक वेळा लोक एज्युकेशन लोनची मदत घेतात. देशातील बहुतांश बँका विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देतात.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी कर्ज (Education Loan) देते. SBI चे शैक्षणिक कर्ज हे एक टर्म लोन आहे. ज्याद्वारे विद्यार्थी केवळ देशातच नाही तर परदेशातही शिक्षण घेऊ शकतात. तुम्ही उच्च शिक्षणासाठी SBI कडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला व्याजदर प्रक्रिया शुल्क आणि या कर्जावरील अभ्यासक्रमांबद्दल माहिती सांगणार आहोत...

या अभ्यासक्रमांसाठी तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळू शकते

एसबीआय स्टुडंट लोनद्वारे, तुम्ही भारतात आणि परदेशातील अनेक अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळवू शकता. SBI एज्युकेशन लोनद्वारे, तुम्हाला नियमित तांत्रिक आणि व्यावसायिक पदवी/डिप्लोमा अभ्यासक्रम, UGC/AICTI/IMC/सरकारने मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठांच्या अनेक पदवी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते. यासोबतच तुम्हाला अनेक नियमित पदवी अभ्यासक्रमांसाठी कर्जही दिले जाऊ शकते. यामध्ये नर्सिंग, सिव्हिल एव्हिएशन, एरोनॉटिक्स, पायलट ट्रेनिंग, शिपिंगचा समावेश आहे. 

SBI शैक्षणिक कर्जाची प्रमुख वैशिष्ट्ये: 

1. या कर्जामध्ये तुम्हाला 8.85 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. मुलींच्या शैक्षणिक कर्जावर 0.50 टक्के व्याजदरात सूट आहे.2. तुम्हाला देशात शिकण्यासाठी 50 लाखांपर्यंत आणि परदेशात शिकण्यासाठी 1.5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.3. 7.5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण ठेवण्याची आवश्यक नाही.4. 20 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.5. तुम्हाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी 10,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल.6. या कर्जाची परतफेड अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर सुरू होते.7. तुम्हाला 15 वर्षांसाठी कर्जाची परतफेड करण्याची सुविधा मिळते.8. दुसरीकडे, जर तुम्ही 4 लाखांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अंतिम मुदत दिली जात नाही.

SBI विद्यार्थी कर्जावर मिळत हे कव्हर 

  • यामध्ये तुमची शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि प्रयोगशाळेची फी समाविष्ट आहे.
  • यामध्ये मुलाचे पुस्तक, आवश्यक उपकरणे, कॉलेज ड्रेस आणि लॅपटॉपची फी समाविष्ट आहे.
  • परदेशात मुलांच्या शिक्षणासाठी पॉकेटमनी.
  • 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे दुचाकी वाहन.