SBI MCLR Rate:  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या एक वर्षाच्या कालावधीतील कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट्स (MCLR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने एक वर्षाच्या MCLR वर 10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. हा दर  याआधी 8.30 टक्के होता. आता हा दर 8.40 टक्के इतका झाला आहे. हे नवीन दर 15 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे गृह कर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Car Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आदींच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार आहे.


MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंट्सची वाढ


स्टेट बँके ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने फक्त 1 वर्षाचा MCLR वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बँक 1 वर्षाच्या MCLR वर 8.30 टक्के व्याजदर आकारत होती. आता हा दर 8.40 टक्के झाला आहे. तर, एका दिवसाचा MCLR 7.85 टक्के, 3 ते 6 महिन्यांचा MCLR 8.00 टक्के, 6 महिन्यांचा MCLR 8.30 टक्के, 2 वर्षांचा MCLR 8.50 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR 8.60 टक्के आहे. 


बँक ऑफ बडोदाने वाढवला MCLR दर


स्टेट बँक ऑफ इंडियाशिवाय बँक ऑफ बडोदानेदेखील आपल्या MCLR दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ केली. नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. आता, बँक ओव्हरनाइट लोनवर 7.85 टक्के, 1 महिन्यावर 8.15 टक्के, 3 महिन्यांसाठी 8.25 टक्के, 6 महिन्यांसाठी 8.35 टक्के आणि 1 वर्षासाठी 8.50 टक्के MCLR आकारण्यात येत आहे.


>> MCLR म्हणजे काय?


Marginal Costs of Fund-Based Lending Rate म्हणजे MCLR हा रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर लागू केला. MCLR मुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपं झालं. MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून MCLR लागू केला. बँक आणि ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, बँकेच्या व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: