Bank Employees : es) मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे. बँकांच्या कर्मचाऱ्यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधीच बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employeया बँकांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. तसेच आठवड्यातून केवळ 5 दिवस कामावर जाण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच बँकांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. 


पगारात 17 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता 


लोकसभा निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे सरकार निर्णय घेत आहे. यावेळी सरकारी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरच त्यांच्या पगारात 17 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2022 पासून त्यांचा पगार वाढणार आहे. देशातील कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांसाठीही आठवड्यातून 5 दिवस कामकाजाचे या धोरणाला मंजुरी मिळू शकते. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारी बँकांमधील सुमारे 8 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून त्यांचा पगार वाढणार असल्याने या कर्मचाऱ्यांनाही मोठी थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे.


बँक आणि कर्मचारी यांच्यात करार 


इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये 17 टक्के वार्षिक पगारवाढीचा करार झाला आहे. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर दरवर्षी सुमारे 8285 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. बँकांची संघटना आयबीए आणि बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. त्याचवेळी, आयबीए संघटनांशी बोलल्यानंतर वार्षिक पगारात आणखी सुधारणा होऊ शकते.


दर शनिवारी सरकारी बँका राहणार बंद ? 


दरम्यान, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये दर शनिवारी सुट्टी मंजूर करण्याचे मान्य केले आहे. सध्या देशात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बँकांमध्ये 5 वर्किंग डे कल्चर येणार आहे. मात्र, यामुळे बँकांमधील कामकाजाचे तास वाढणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारने हे प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि नियम अधिसूचित केल्यानंतर घेतला जाईल.


महिलांना अतिरिक्त आजारी रजा ?


नवीन वेतन करारानुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देता दरमहा एक दिवसाची 'आजारी रजा' घेण्याची मुभा असणार आहे.


पगारी रजेबाबत मोठा निर्णय


बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बँक कर्मचाऱ्यांना त्यांची पगारी रजा जमा करण्याचा अधिकार मिळणार आहे. निवृत्तीच्या वेळी किंवा कार्यालयात काम करत असताना मृत्यू झाल्यास पुढील 255 दिवसांसाठी हे (पगार म्हणून) वापरले जाऊ शकते.


महत्वाच्या बातम्या:


केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी