Salary Hike News: कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांसाठी (Employees) एक आनंदाची बातमी आहे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ (Salary hike) होणार आहे. पगारवाढीचा हंगाम जवळ येत आहे. कंपन्यांनी यावर्षी सरासरी पगारात 10 टक्के वाढ करण्याची तयारी केली आहे. ऑटोमोबाइल, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
कंसल्टन्सी फर्म मर्सरने TRS एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात मर्सरने सांगितले की, कॉर्पोरेट जगतातील सरासरी पगार 2024 मध्ये 10 टक्क्यांनी वाढू शकतो. 2023 मध्ये 9.5 टक्के पगारवाढ झाली होती. आर्थिक आघाडीवर भारताच्या मजबूत कामगिरीमुळं आणि नाविन्य आणि प्रतिभा केंद्र म्हणून त्याचे वाढते आकर्षण यामुळं हा कल दिसून येतो. सर्वेक्षणानुसार, ऑटोमोबाईल, उत्पादन, अभियांत्रिकी आणि जीवन विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सर्वाधिक वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, हे सर्वेक्षण मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आले होते, ज्यामध्ये 21 लाख कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 6000 लोकांच्या सहाय्यानं 1474 कंपन्यांकडून डेटा गोळा करण्यात आला होता. सर्वेक्षण विविध उद्योगांमधील पगाराच्या ट्रेंडवर लक्ष केंद्रित करते. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची कामगिरी, संस्थात्मक कामगिरी आणि स्थिती हे तीन मापदंड होते. ज्याच्या आधारावर वाढ श्रेणी निश्चित केली गेली आहे. सर्वेक्षणानुसार, 2024 मध्ये सरासरी पगारवाढ ही 10 टक्के असणार आहे. जी 2023 मध्ये 9.5 टक्के होती.
अर्थव्यवस्थेत वेगानं वाढ सुरु
एकीकडे जगभरातील कंपन्यांमध्ये टाळेबंदी सुरू असताना भारतात मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वेतनवाढ होताना दिसत आहे. 2024 मध्ये बांगलादेश आणि इंडोनेशियामध्ये अनुक्रमे 7.3 टक्के आणि 6.5 टक्के सरासरी पगारवाढ अपेक्षित आहे. भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतात सर्वाधिक वेतनवाढ सुरु राहिली आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असून, संतुलित महागाई, व्याजदरातील स्थिरता आणि औद्योगिक उत्पादनाच्या वाढत्या आकडेवारीवरुन देशातील कामगार वर्गालाही याचा लाभ मिळेल, अशी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या: