Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात हल्ला पुकारल्यानंतर आता त्याचे आर्थिक परिणाम दिसू लागले आहेत. पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली. तर, आता अनेक कंपन्यांनी रशियातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्यांनी रशियातील व्यवसाय, गुंतवणूक कमी केली आहे. रशियाने युक्रेनविरोधात अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता काही व्यवसाय, कंपन्यांनी रशियातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हजारो रशियन कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  


कोणत्या कंपन्यांनी घेतली माघार


रशिया आणि बेलारुसमध्ये गेम्स आणि कंटेटची विक्री न करण्याचा निर्णय इलेक्ट्रॉनिक्स आर्ट्सने घेतला आहे. र्व्हच्युअल करन्सी बंडलसह गेम्स आणि कंटेटच्या विक्री करण्यावर स्थगिती आणत असल्याचे कंपनीने म्हटले. हा निर्णय रशिया आणि बेलारुससाठी घेण्यात आला आहे. यामागे रशिया-युक्रेनचे कारण असण्याची शक्यता आहे. 


सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटले की, सध्याचा भू-राजकीय घटनाक्रम लक्षात घेता रशियाला जाणारे शिपमेंट्स थांबवण्यात आला आहे. त्याशिवाय, सॅमसंगने मानवीय दृष्टीकोणातून 60 लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे.


रशियातील सर्वात मोठी डेअरी व्यवसाय करणारी कंपनी Danone ने देखील माघार घेण्याची घोषणा केली आहे. Danone ने जवळपास 30 वर्षापूर्वी रशियन बाजारपेठेत प्रवेश केला होता. 


कोका कोलानेदेखील रशियातून माघार घेतली आहे. कंपनीवर रशियातून माघार घेण्यासाठी मोठा दबाब होता. शुक्रवारी NOVUS स्टोअरने कोका कोला कंपनीसोबत असलेली आपली भागिदारी संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. 


त्याशिवाय, शूज तयार करणारी अमेरिकन कंपनी NIKE आणि फर्निचरशी संबंधित स्वीडिश कंपनी IKEA ने देखील रशियातील आपले स्टोअर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha