आजपासून अर्थात एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षात काही नियमात बदल होणार आहे. याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवीन कर, तरतुदी उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेटही बिघडण्याची भीती आहे.
नेमके काय होणार बदल? जाणून घ्या...
>> ज्येष्ठ नागरिक बचत आणि योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करता येणार
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील.
- आतापर्यंत या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकत होते, या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज दिले जात आहे.
- याशिवाय ज्येष्ठ नागरिक आता मासिक उत्पन्न योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील.
- जोडीदार देखील ही रक्कम जमा करू शकतो आणि संयुक्त खात्यात 15 लाख जमा करू शकतात. या योजनेत 7.1% वार्षिक व्याज मिळत आहे.
>> नवी कर प्रणाली
- आजपासून नवी कर प्रणाली लागू होणार
- नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे. याआधी 5 लाख इतकी मर्यादा होती.
- अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला. त्यानुसार नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणार आहे. म्हणजे 7.5 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही.
>> कार खरेदी महागणार
- एक एप्रिलपासून BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्स लागू होणार आहे.
- एक एप्रिलपासून BS6-II कारची विक्री होणार आहे.
- त्यामुळे मारुती, होंडा, हुंडाई, टाटासह अनेक कंपन्यांनी वाहनाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे.
- टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ केली आहे.
- BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्समुळे वाहनांच्या किंमतीत 50 हजारांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे.
>> जीवरक्षक औषधे आणि पेनकिलर्स महागणार
- पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे महाग होणार आहेत.
- सरकारने औषध कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे.
- घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलांच्या आधारे किमती वाढणार आहेत.
- या औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
>> व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार
- रस्त्यावरील प्रदूषण आणि अपघात रोखण्यासाठी जुन्या वाहनांना रोखण्यासाठी सरकारकडून स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे.
- स्क्रॅपिंग धोरणानुसार, 10 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी खाजगी प्रवासी वाहनांना प्रदूषण आणि फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
>> सोने खरेदी महाग होईल
- अर्थसंकल्पात, सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क 20 टक्क्यांवरून 25 टक्के, चांदीवर 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आले आहे.
- यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात.
>> प्रवास महागणार, टोल वाढणार
NHAI ने टोलच्या दरात किमान 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. टोलचे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. देशभरातील महामार्गावर प्रवास करणे महाग होणार आहे.
काय स्वस्त होणार?
• मोबाईल फोन
• इलेक्ट्रिक वाहने
• टेलिव्हिजन संच
• बॅटरी
• कॅमेरा लेन्स
• कॅमेरा
काय महाग होणार
• चांदी
• पितळ
• सिगारेट
• सोने
• प्लॅटिनम
• आयात केलेले दरवाजे
• खेळणी
• सायकल
• इलेक्ट्रिक किचन चिमणी