Rice MSP: तांदळाच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याची मागणी पंजाब सरकारनं  (Punjab Government) केली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावात पंजाब सरकारनं पुढील वर्षीपासून 3 हजार 284 रुपये प्रति क्विंटल दराने तांदळाची खरेदी करण्यास मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करावी. जेणेकरून पुढील बाजार हंगामात शेतकऱ्यांना तांदळाच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा कमावता येईल.


पंजाब सरकारने 2024-25 या वर्षासाठी तांदळाची एमएसपी 'सामान्य' जातीसाठी 3,284 रुपये प्रति क्विंटल आणि ग्रेड A उत्पादनासाठी 3,324 रुपये प्रति क्विंटल निश्चित करावी अशी मागणी केली आहे. केंद्राने धानाच्या एमएसपीमध्ये 100 रुपये प्रति क्विंटल अशी वेगळी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. विशेष म्हणजे पंजाब कृषी विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये इनपुट कॉस्टच्या आधारे एमएसपी प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, दरवर्षी राज्य सरकार खरीप आणि रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याचा प्रस्ताव पाठवते.


कापसाचा MSP 10,767 रुपये प्रति क्विंटल करावी


2024-25 या वर्षासाठी तांदळाची MSP 'सामान्य' जातीसाठी 3,284 रुपये प्रति क्विंटल आणि ग्रेड A उत्पादनासाठी 3,324 रुपये प्रति क्विंटल निश्चित करावी अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. गेल्या वर्षी पंजाबने धानाचा एमएसपी 3,184 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी केली होती, परंतु केंद्राने 2,183 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर केला होता. राज्य सरकारने केंद्राकडे पुढील हंगामासाठी कापसाचा एमएसपी 10,767 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्याची मागणी केली आहे, तर गेल्या वर्षी 8,860 रुपये प्रति क्विंटल दराची मागणी केली होती.


पंजाबमध्ये गहू आणि भाताची मोठ्या प्रमाणात लागवड 


पंजाब हे कृषीप्रधान राज्य आहे. येथे शेतकरी गहू तसेच भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यावर्षी शेतकऱ्यांनी सुमारे 32 लाख हेक्टरवर भाताची पेरणी केली होती. कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 2023-24 च्या खरीप हंगामात पंजाबमध्ये 205 लाख टनांहून अधिक धानाचे उत्पादन होऊ शकते. तर 2020-21 च्या पीक हंगामात 208 लाख टन धानाचे उत्पादन झाले, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. मात्र, यंदा पंजाबमध्ये 185 लाख टनांहून अधिक धानाची खरेदी झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य कोणते आहे? संपूर्ण यादी एका क्लिकवर