Retail Inflation: डिसेंबर (December) महिन्याची किरकोळ महागाई दराची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई (Retail Inflation) दर 5.69 टक्के होता. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत महागाई दर वाढला आहे. अशातच औद्योगिक उत्पादनातील वाढ देखील कमी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर हा 5.55 टक्के होता. नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाची वाढ 2.4 टक्के होती. ऑक्टोबर महिन्यात ती 11.7 टक्के होती.


डिसेंबरमधील महागाईचा संपूर्ण तपशील


डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.69 टक्के होता, जो नोव्हेंबर महिन्यात 5.55 टक्के होता. अन्नधान्य महागाई दर 9.53 टक्के होता जो नोव्हेंबरमध्ये 8.70 टक्के होता. ग्रामीण भागातील महागाई 5.93 टक्के होती जी नोव्हेंबरमध्ये 5.85 टक्के होती. शहरी महागाई 5.46 टक्के होती, जी नोव्हेंबरमध्ये 5.26 टक्के होती. कोर महागाई दर 3.9 टक्के होता जो नोव्हेंबरमध्ये 4.1 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबरमधील तिमाहीबद्दल बोलायचे तर, सरासरी महागाई दर 5.37 टक्के होता.


डाळींच्या भाववाढीपासून दिलासा नाही


डिसेंबर महिन्यात डाळींच्या महागाईत वाढ झाली असून ती 20.73 टक्के झाली आहे. जी नोव्हेंबर महिन्यात 20.23 टक्के होती. भाज्यांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली असून, गेल्या महिन्यात 17.70 टक्के होताी ती 27.64 टक्के झाली आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. ती 9.93 टक्के राहिला आहे जो मागील आठवड्यात 10.27 टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर 19.69 टक्के आहे जो मागील महिन्यात 21.55 टक्के होता. फळांचा महागाई दर 11.14 टक्के आहे जो मागील महिन्यात 10.95 टक्के होता.


महागड्या ईएमआयमधून अद्याप दिलासा नाही


किरकोळ महागाई सरकार आणि आरबीआयची चिंता वाढवणार आहे. विशेषत: भाजीपाला आणि डाळींची भाववाढ थांबण्याची चिन्हे दिसत नसून, त्याचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे. RBI फेब्रुवारी महिन्यात आर्थिक धोरण जाहीर करेल. अशा स्थितीत किरकोळ महागाई वाढल्यानंतर स्वस्त कर्जाच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत. गोल्डमन सॅक्सने आपल्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, आरबीआय या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपासून व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या देशावर उपासमारीची वेळ, लोक दुकानांमधून चोरतायेत 'या' वस्तू