Bank of Baroda News : बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda)  बाबतीत मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ बडोदाला दिलासा दिला आहे. RBI ने तब्बल सात महिन्यांनंतर बँक ऑफ बडोदा 'बॉब वर्ल्ड' ॲप्लिकेशनद्वारे नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिली आहे. RBI 10 ऑक्टोबर 2023 रोजी बँक ऑफ बडोदा नवीन ग्राहक न जोडण्याच्या संदर्भात सूचना केली होती. अखेर सात महिन्यांनी ग्राहक जोडण्याची परवानगी मिळाली आहे.


बँक ऑफ बडोदाबरोबरच बजाज फायनान्सवरील बंदीही उठवली


बँक ऑफ बडोदाला 'बॉब वर्ल्ड' ॲप्लिकेशनद्वारे ग्राहक जोडण्याची परवागी मिळाली आहय यानंतर शेअर बाजाराला एक पत्रही लिहलं आहे. यामध्ये निर्बंध हटवल्याच्या संदर्बातील माहिती दिलीय. आरबीआयने 8 मे रोजी निर्बंध हटवल्याच्या संदर्भातील माहिती बँक ऑफ बडोदाला कळवली आहे. त्यामुळं नियमानुसार बँक आता ग्राहकाना जोडण्याचे काम करेल. बँक ऑफ बडोदाबरोबरच गेल्या आठवड्यातच बजाज फायनान्सलाही RBI कडून दिलासा मिळाला आहे.  RBI ने बजाज फायनान्सवरील ईकॉम आणि इंस्टा ईएमआय कार्डद्वारे कर्ज देण्यावर बंदी घातली होती. ती बंदी देखील हटवली आहे.  


कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई


गेल्या काही दिवापूर्वीच रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेच्या IT जोखीम व्यवस्थापनात कमतरता आढळून आल्या आहेत. त्यामुळं आता कोटक महिंद्रा बँकेवरील RBI बंदी कधी उठणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


RBI ने का केली होती कारवाई? 


दरम्यान, बँक ऑफ बडोदावर बँकेनं का कारवाई केली होती? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर  बँकेच्या बॉब वर्ल्ड या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना नव्याने सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सदोष होती. या प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदाही घेतला जात होता. बँकेचेच काही कर्मचारी बॉब वर्ल्ड ॲपवर बनावट ग्राहकांना सामील करून घेण्यामध्ये गुंतले होते. बँकेच्या भोपाळ विभागीय कार्यालयामधील काही कर्मचारी या त्रुटींचा गैरफायदा घेत होते. त्यांनी बॉब वर्ल्डवरील नोंदणीचे आकडे वाढवण्यासाठी बँकेची काही खाती वेगवेगळ्या लोकांच्या मोबाइल नंबरशी जोडली होती. हा सगळा प्रकार आरबीआयच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेवर ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आरबीआयने ही कारवाई केल्यानंतर बँकेच्या ॲपच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करू, असे आश्वासन बँकेने आरबीआयला दिले होते. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! RBI नं केली 5 बँकांवर कारवाई, ठोठावला 60.03 लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?