Reliance Industries: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने (Reliance Industries) नुकतेच डिज्ने हॉटस्टार या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा मालकी हक्क मिळवला आहे. त्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रिजने डिज्ने हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि जिओ सिनेमा (JioCinema) यांचे विलीनकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म हा डिज्ने हॉटस्टार याच नावाने ओळखला जाणार आहे. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या या नव्या प्लॅटफॉर्मकडे एकूण 100 चॅनेल्स आणि 2 स्ट्रिमिंग सर्व्हिसेस असतील. 


जिओ सिनेमाला वेगळं अस्तित्व राहणार नाही


रिलायन्स इंडस्ट्रिजच्या या निर्णयाबाबत इकोनॉमिक्स टाईम्सने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार स्टार इंडिया (Star India) आणि वियाकॉम 18 (Viacom18) या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर डिज्ने हॉटस्टार हा एकमेव स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असेल. रिलायन्स इंडस्ट्रिजला दोन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म चालवायचे नाहीत. जिओ सिनेमाचे मर्जक केले जाईल. स्ट्रिमिंगचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रिजने वेगवेगळे पर्याय शोधले होते. सुरुवातीला दोन्ही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स स्वतंत्रपणे चालवण्याचे ठरवण्यात आल्याची चर्चा होती. डिज्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन्ही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्समधील एक मंच क्रीडा तर दुसरा प्लॅटफॉर्म हा मनोरंजनासाठी काम करेल, असं सूत्र अवलंबण्याचाही रिलायन्स इंडस्ट्रिजचा विचार होता. मात्र डिज्ने हॉटस्टारकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे रिलायन्स इंडिस्ट्रिजतर्फे याच प्लॅटफॉर्मला कायम ठेवले जाईल आणि जिओ सिनेमाचे विलीनकरण होऊ होईल. 


डिज्ने हॉटस्टारचे वापरकर्ते जास्त


याआधीही रिलायन्स इंडस्ट्रीज दोन वेगवेगळे स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म साचलवण्याच्या मन:स्थीतीत नाही, असे म्हटले जात होते. डिज्ने हॉटस्टरला आतापर्यंत साधारण 50 कोटी लोकांनी डाऊनलोड केलेले आहे. तर जिओ सिमेनाचे डाऊनलोड्स फक्त 10 कोटी आहेत. त्यामुळे डिज्ने हॉटस्टरचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात रिलायन्स आणि डिज्ने यांच्यात स्टार आणि वायकॉम 18 च्या विलीनीकरणाचा करार झाला होता. हा करार साधारण 8.5 अब्ज डॉलर्समध्ये झाला होता.


प्रिमियर मेंबरशीपची काय स्थिती?


दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रिजच्या वार्षिक अहवालानुसार जिओ सिनेमाच्या मासिक वापरकर्त्यांची संख्या 22.5 कोटी आहे. तर डिज्ने हॉटस्टारचे साधारण 33.3 कोटी मासिक वापरकर्ते आहेत. डिज्ने हॉटस्टारचा साधारण 3.5 कोटी लोक फिस देऊन वापर करतात. इंडियन प्रिमियर लीगच्या दरम्यान हा आकडा 6.1 कोटी सबस्क्रायबर्सपर्यंत वाढला होता. 


हेही वाचा :


मोठी बातमी! मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची करण जोहरशी हातमिळवणी; कोट्यवधीचा करार होणार?


मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमवतात? त्यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं म्हटल्यावर लागतील पावणे दोन कोटी वर्षे!


खिशात पैसे घेऊन राहा तयार! मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी