मुंबई : सध्या उन्हामुळे वातावरणातील गरमी वाढली आहे. घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळांनी अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे एसीची विक्री वाढली आहे. एसी तयार करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यात चांगलीच वाढ झाली आहे. परिणामी एसी तयार करणाऱ्या कंपन्यांत पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार सध्या मालामाल झाले आहेत.  


एसी तयार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सुस्साट


सध्या अनेक शहरांत पारा चांगलाच वाढताना दिसतोय. अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पाहोचलंय. दिल्लीमध्ये तर हेच तापमान थेट 50 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. अशा स्थितीत लोक एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. घराती एसी कुलर नसेल तर लोक त्याची खरेदी करत आहेत. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार या वर्षा गरमी गेल्या 100 वर्षांतील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळेच एसी तयार करणाऱ्या कंपन्यांत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले दिवस आले आहेत. गेल्या पाच दिवसांत तर एसी तयार करणाऱ्या या कंपन्यांचे शेअर रॉकेटप्रमाणे वर जात आहेत.


HITACHI कंपनीत गुंतवणूक करणारे मालामाल 


देशात सध्या भीषण तापमान वाढले आहे. मात्र अवघ्या पाच दिवसांत एसी तयार करणाऱ्या हिताची या कंपनीने 47 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने 53 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. आज दिवसभरात या कंपनीच्या शेअरमध्ये एका टक्क्याने घसरण झाली. सध्या या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 1,729 रुपये आहे. 


कधी फक्त 34 रुपयांना होता शेअर 


1999 या कंपनीच्या शेअरचे मूल्य फक्त 34 रुपये रुपये होते. जानेवारी 2010 मध्ये हा शेअर 343 रुपयांपर्यंत वाढला होता. 10 एप्रिल 2015 रोजी या शेअरचा भाव 1639.30 रुपयांपर्यंत पोहोचला. सध्या हाच शेअर 1800 रुपयांपर्यंत वाढला आहे. 1999 सालापासून या कंपनीने गुंतवणूकदारांना 5,212.41 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 


एका वर्षात किती परतावा? 


एका वर्षात हिताची या कंपनीने गुंतवणूकदारांना 77.20 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. जनवरी महिन्यापासून या स्टॉकमध्ये 63 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. पाच वर्षात या शेअरमध्ये साधारण 1 टक्क्यांची घसरण झालेली आहे. या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वांधिक मूल्य 938 आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 3,379 कोटी रुपये आहे.


हेही वाचा :


मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?


आरोग्य विमा धारकांना मोठा दिलासा, IRDAI च्या 'या' नव्या निर्णयामुळे आता 3 तासांत क्लेम सेटलमेन्ट!


घरात किती सोनं साठवता येतं? एक व्यक्ती किती सोनं खरेदी करू शकते; वाचा नियम काय सांगतो?