Agriculture News: देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chillies) बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bazar Samiti) ओळख आहे. फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा पार केला आहे. हंगाम संपेपर्यंत बाजार समितीत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


ओल्या लाल मिरचीला 2500 ते 9000 हजार रुपयापर्यंतचा दर 


यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. 2 लाख 60 हजार आवक झाली आहे. सध्या ओल्या लाल मिरचीला 2500 ते 9000 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. तर कोरड्या लाल मिरचीला 7500 ते 18000 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. तर दररोज 100 ते 150 वाहनातून 2000 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. मार्च अखेरपर्यंत हंगाम सुरु राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जात असते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे काही ठिकाणी मिरची पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मिरचीच्या पिकावर चुरडामुरडा आणि डवणीचा प्रादुर्भाव झाला होता. अशा स्थितीत देखील शेतकऱ्यांना मिरचीचं चांगल उत्रादन घेतलं आहे. मिरचीचे पोषण योग्य होत नसल्याने मिरचीचे उत्पादनात प्रचंड घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. जिल्ह्यात वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वाधिक फटका मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत आहे. वारंवार होणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसत आहे. यामुळं मिरची काळी पडणे आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट आले आहे. तसेच अवकाळी पावसात सापडलेल्या मिरचीची पतवारी कमी झाल्याने तिला मिळणारा दरही कमी झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


नंदुरबारमधील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, मिरचीवर चुरडा मुरडा आणि डावणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव