Property Price Hike : गेल्या काही वर्षांत भारतात घरांच्या किमतींमध्ये (Real estate property prices) प्रचंड वाढ झाली आहे. घरांच्या किमती वाढण्याचा हा ट्रेंड अजूनही कायम आहे. नाइट फ्रँक ग्लोबल हाऊस प्राइस इंडेक्सच्या अहवालानुसार (knight frank global house price index report ) भारतातील मालमत्तेच्या किंमती या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर 5.9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मालमत्तेच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यानं जागतिक यादीत भारत 18 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील 3 महिन्यांत घरांच्या किंमती  6 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 


घरांच्या किंमतीत किती वाढ झाली 


नाईट फ्रँकच्या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, भारतातील निवासी मालमत्तेच्या किंमतीत सरासरी वार्षिक आधारावर 3.5 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी हा दर 3.7 टक्के होता. अशा स्थितीत घराच्या किंमतीत सरासरी वाढ ही परिस्थिती कोरोनाच्या कालावधीपूर्वी पोहोचली आहे.


मालमत्तेच्या किंमती का वाढत आहेत?


या अहवालात भारतातील घरांच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणे देण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात महागाई वाढल्यानं व्याजदरात सातत्यानं वाढ होत आहे. असे असूनही, मालमत्तेच्या किंमती सतत वाढत आहेत कारण देशाचा विकासदर काही काळ स्थिर आहे. यामुळं लोकांमध्ये आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढली आहे. जास्त व्याजदर असूनही मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यासोबतच, केंद्र आणि राज्य सरकारे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी सातत्याने मोठी पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम विक्रीच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे. सिमेटं आणि सळईच्या किंमतीत देखील वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं तुमच्या घराचं महाग झालं आहे. सातत्यानं वाढणाऱ्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना घर घेणं शक्यत होत नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


पतीने पत्नीला घर चालवण्यासाठी पैसे दिले तर पत्नीला कर भरावा लागेल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर


 


'या' देशांमध्ये मालमत्तेच्या किमती सर्वाधिक वाढल्या


नाइट फ्रँकने आपल्या अहवालात 2023 मध्ये घरांच्या किंमती सर्वाधिक वाढलेल्या देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुर्कीने 89.20 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. तर निवासी मालमत्तेच्या किमती क्रोएशियामध्ये 13.7 टक्के, ग्रीसमध्ये 11.9 टक्के, कोलंबियामध्ये 11.2 टक्के आणि उत्तर मॅसेडोनियामध्ये 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीत भारताचे नाव 14 व्या स्थानावर आहे, जेथे तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर या कालावधीत मालमत्तेच्या किमतीत वार्षिक आधारावर 5.9 टक्के वाढ दिसून आली आहे.