Credit Card Debit Card New Rules: येत्या 1 जुलैपासून क्रेडिट, डेबिट आणि को-ब्रँडेड कार्डसाठी बनवलेले काही नवीन नियम लागू करण्याची आपली योजना रिझर्व्ह बँकेने पुढे ढकलली आहे. बँकिंग उद्योगाच्या मागणीनुसार आता हे नियम तीन महिन्यांनंतर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू केले जाणार आहेत. 


1 जुलैपासून लागू होणार्‍या नियमांमध्ये ग्राहकाच्या संमतीशिवाय क्रेडिट मर्यादा न वाढवणे आणि ग्राहकाने महिनाभर क्रेडिट कार्ड सक्रिय न केल्यास ते बंद करण्याचाही समावेश होता.  आरबीआयने 21 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात 1 जुलै 2022 पासून लागू होत असलेल्या काही नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली असून हे नियम आता 1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून लागू होतील असं म्हटले. 


उद्योगाशी संबंधित सर्व भागधारकांचे म्हणणे ऐकून आणि त्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आरबीआयने आपल्या निवेदनातून प्रकाशित केली आहे


इंडियन बँक्स असोसिएशनने वेळ मागितली होती


बँकांची सर्वोच्च संस्था इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कार्डसाठी तयार केलेले नवीन नियम लागू करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची वेळ मागितली आहे. आता रिझर्व्ह बँकेने बँका आणि इतर संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून घेत 1 जुलैपासून काही नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे.


आता 'हे' नियम लागू नाहीत


नवीन नियमांमध्ये पहिली तरतूद अशी आहे की, जर एखाद्या ग्राहकाने स्वतःहून 30 दिवसांच्या आत एखाद्या कंपनीचे क्रेडिट कार्ड सक्रिय केले नसेल, तर ग्राहकाला कंपनी सक्रिय करावी लागेल. संमती घ्यावी लागेल. ही संमती ओटीपीद्वारे घेतली जाईल. ग्राहकाने संमती न दिल्यास क्रेडिट कार्ड खाते बंद करावे लागेल.  दुसरी तरतूद, जी 1 जुलैपासून लागू होणार नाही, ती अशी आहे की, ग्राहकांची मंजुरी घेतल्याशिवाय क्रेडिट मर्यादा वाढवता येणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या:


अत्यंत महत्त्वाची बातमी ! नातेवाईकांना मालमत्तेच्या हस्तांतरणावर मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही
Share Market: शेअर बाजार वधारला, Nifty 15,600 वर तर Sensex ची 934 अंकांची उसळण