मुंबई: सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात (Share Market) (वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 934 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी हा 288 अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये आड 1.81 टक्क्यांची वाढ होऊन तो 52,532 वर स्थिरावला आहे तर निफ्टीमध्ये 1.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,638 अंकांवर स्थिरावला. आज एकूण 2428 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 819 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 125 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.


आज शेअर बाजार बंद होताना केवळ अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर Titan Company, Hindalco Industries, JSW Steel, Coal India आणि Adani Ports या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. 


आयटी, मेटर, ऑईल अॅन्ड गॅस,रिअॅलिटी आणि सार्वजिनिक बँका यांच्या शेअर्समध्ये 3 ते 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बीएसई मिडकॅपमध्ये 2.4 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.


रुपयाची घसरण
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची 10 पैशाने घसरण झाली असून रुपयाची किंमत 78.08 इतकी झाली आहे.


शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक
आज व्यवहाराच्या सुरुवातीला, BSE सेन्सेक्स 299.76 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 51,897.60 वर उघडला. तर NSE चा निफ्टी 105.80 अंकाने म्हणजेच, 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 15,455.95 वर उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्सने सुरुवातीच्या मिनिटातच 51,900 चा टप्पा पार केला.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Titan Company- 5.93 टक्के

  • Hindalco- 5.52 टक्के

  • JSW Steel- 4.70 टक्के

  • Coal India- 4.50 टक्के

  • Adani Ports- 3.91 टक्के


या कंपनीच्या शेअर्समध्ये घट झाली



  • Apollo Hospital- 0.09 टक्के